जिल्हाधिकारी कार्यालयास कुलुप लावण्याचा प्रयत्न 

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 7 जून 2017

परभणी : शेतकरी संपातील आंदोलनाचा भाग म्हणून किसान क्रांती समन्वय समितीच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालयास कुलुप लावण्याचा प्रयत्न मंगळवारी झाला. त्यावेळी तेथे उपस्थित पोलीसांनी तात्काळ आंदोलनकर्त्यांना अडवून हा प्रकार रोखला.

परभणी : शेतकरी संपातील आंदोलनाचा भाग म्हणून किसान क्रांती समन्वय समितीच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालयास कुलुप लावण्याचा प्रयत्न मंगळवारी झाला. त्यावेळी तेथे उपस्थित पोलीसांनी तात्काळ आंदोलनकर्त्यांना अडवून हा प्रकार रोखला.

 राज्यात सुरू असलेल्या शेतकरी संपाचे पडसाद परभणीत उमटत आहेत. सोमवारी जिल्हा बंद यशस्वी केल्यानंतर मंगळवारी ठरल्याप्रमाणे सरकारी कार्यालयांना कुलूप लावण्याचे आंदोलन करण्यात आले. परभणीत जिल्हाधिकारी कार्यालयाच्या मुख्य प्रवेशद्वाराजवळ सकाळी अकराच्या सुमारास किसान क्रांती समन्वय समितीचे पदाधिकारी आले होते. मात्र त्याठिकाणी पोलीसांनी मोठा बंदोबस्त केला होता. कार्यालयाचा दरवाजा आतून लावलेला असतल्याने कार्यकर्त्यांना आतमध्ये जाता आले नाही. किसान क्रांती समितीच्या कार्यकर्त्यांनी आणलेले कुलूप मुख्य दरवाजाला लावण्याचा प्रयत्न केला. काही वेळ कुलूप लावलेही परंतु पोलीसांनी किल्ली हस्तगत करुन कुलूप काढले. त्यामुळे आंदोलनकर्त्यांनी जिल्हाधिकारी पी.शिवाशंकर यांची भेट घेऊन त्यांना शेतकऱ्यांच्या विविध मागण्यांचे निवेदन दिले. त्यावर विलास बाबर, गणेश घाटगे, चंद्रकांत पांगरकर, रामेश्वर आवरगंड, अशोक कांबळे, तुकाराम खिल्लारे, भिमराव मोगले, मुंजाजी तारडे, विष्णु मोगले, शिवाजी कदम, दिनकर गरुड, शंकर भागवत आदींच्या स्वाक्षऱ्या आहेत. 

परभणीत भाजीपाला विक्री सुरु 
बाजारात गेले आठवडाभर भाजीपाल्याची आवक घटली आहे. सोमवारच्या बंदमुळे आणि त्याआधी रविवारी शहराबाहेर भाजीपाला रस्त्यावर फेकल्याने शहरात बाहेरुन भाजीपाला येणे कमी झाले आहे. शहरात तीन दिवसापूर्वीचा भाजीपाला विक्री केला जात होता. तुरळक ठिकाणीच भाजीपाला उपलब्ध होता. त्यामुळे ग्राहकांची गर्दी उसळली होती. मंडईतील उपलब्ध असलेल्या भाज्यांचे दरही तीन दिवसांच्या तुलनेत मंगळवारी वाढले होते.  

मराठवाडा

औरंगाबाद - उभ्या ट्रकला दुचाकी धडकून झालेल्या अपघातात लष्करातील जवान ठार झाला. भरत भास्करराव देशमुख (वय ३९, रा. चिकलठाणा, हनुमान...

09.39 AM

औरंगाबाद - एखाद्या जिवाची तगमग कोणत्याही जिवाला असह्य करणारी असते. मांजात अडकलेल्या वटवाघुळाची तगमगही एकास पाहवली गेली नाही....

09.39 AM

औरंगाबाद - पक्ष्यांसाठी घातक ठरलेल्या मांजामुळे दोन दिवसांपासून एका झाडावर अडकून पडलेल्या कावळ्याचे अग्निशामक दलाच्या पथकाने...

09.39 AM