किनवटमध्ये कर्जबाजारी शेतकऱ्याची आत्महत्या

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 13 नोव्हेंबर 2016

नांदेड - सततची नापिकी व कर्जबाजारीपणाला कंटाळून एका शेतकऱ्याने विष प्राशन करून आत्महत्या केली. ही घटना शुक्रवारी (ता.11) किनवट तालुक्‍यातील चिंचखेड येथे घडली.

चिंचखेड येथील शेतकरी विष्णू संभाजी वानखेडे (वय 55) यांच्या शेतात तीन वर्षांपासून सतत नापिकी होत होती. त्यांनी बॅंकेचे व काही खासगी सावकाराचे कर्ज काढले होते. शेतात सतत नापिकी असल्यामुळे कर्जाची परतफेड वेळत होत नव्हती. या विवंचनेत ते होते. चिंचखेड शिवारात जाऊन त्यांनी विष प्राशन केले. त्यांना किनवट रुग्णालयात दाखल करण्यापूर्वीच त्यांचे निधन झाले.