’सकाळ’मुळे शेतकर्‍यांच्या जीवनात आनंद : अर्जुन खोतकर

farmers happy for Sakal's water conservation work : Arjun Khotkar
farmers happy for Sakal's water conservation work : Arjun Khotkar

जालना - मराठवाड्यातील दुष्काळ निवारणार्थ सकाळ माध्यम समुहाने हाती घेतलेले जलसंधारणाचे कार्य शेतकर्‍यांच्या जीवनात खऱ्या अर्थाने आनंद फुलविणारे आहे, असे प्रतिपादन राज्याचे पशुसंवर्धन व दुग्धविकास राज्यमंत्री अर्जुन खोतकर यांनी केले.

गोंदेगाव (ता.जालना) येथे सकाळ रिलीफ फंडातून हाती घेण्यात आलेल्या नदी खोलीकरणाच्या कामाचे उद्घाटन सोमवारी (ता.24) खोतकर यांच्याहस्ते झाले. या वेळी जिल्हा परिषद सदस्य बबन खरात, शिवसेनेचे उपजिल्हाप्रमुख पंडित भुतेकर, शहरप्रमुख विष्णू पाचफुले, माजी पंचायत समिती सदस्य ब्रम्हा वाघ, सरपंच वाल्मिक वाघ, तहसीलदार बिपिन पाटील, नायब तहसीलदार संदीप ढाकणे, साहेबराव वाघ, जयाजी चौरे, बबन जाधव, सुभाष चौरे आदींची प्रमुख उपस्थिती होती.

खोतकर म्हणाले, की दुष्काळी परिस्थितीमुळे हवालदिल झालेल्या शेतकर्‍यांच्या मदतीसाठी शासनासोबतच अनेक खासगी व सेवाभावी संस्था पुढे येत आहे. माध्यम म्हणून सकाळने कायम सकारात्मक भूमिका घेतली आहे. अग्रोवन, तनिष्का महिला मंडळ, सकाळ रिलीफ फंड या माध्यमातून सकाळने हाती घेतलेले विकास कार्य कौतुकास्पद आहे. शेतकरी हिताच्या अशा कामांना आपले कायम सहकार्य राहील, असेही ते म्हणाले. अन्य उपस्थित मान्यवरांनी जलसंधारणाच्या कामाबाबत आपली भूमिका मांडून सकाळच्या उपक्रमास शुभेच्छा दिल्या.

तहसीलदार पाटील, ढाकणे सकाळ यांनी खोलीकरणाच्या कामाची पाहणी करून सकाळच्या उपक्रमाचे कौतुक केले. कार्यक्रमास ग्रामसेविका के.पी.इंगळे, यु.बी. थंगाळे, कृषिसेविका एस.डी. सोनवणे, तलाठी श्रीमती एस.एस.ढवळे, रंजन खरात, अनिरुद्ध वाघ, बळिराम वाघ, शाहू खंदारे, फकिरा शेख, प्रकाश भालेकर, बद्री वाघ, भास्कर पवार, बबन जाधव, शिवाजी जाधव, कृष्णा जाधव, रामू वाघ, राजू वाघ, बबन वाघ यांच्यासह तनिष्का सदस्यांची उपस्थिती होती.

आत्महत्या मन सुन्न करणार्‍या
वडिरामसगाव येथील शेतकरी आत्महत्याग्रस्त कुटुंबीयांची  नुकतीच भेट घेतली. जिल्ह्यात वाढत्या शेतकरी आत्महत्येच्या घटना मन सुन्न करणार्‍या आहेत. आज शेतकरी असो की व्यापारी प्रत्येकाच्या डोक्यावर कर्ज आहेच. व्यापार्‍यांवर कोट्यवधींची कर्ज असते, परंतु ते आत्महत्या करतात का ?. काही अडचणी असतील तर शेतकर्‍यांनी येऊन आपल्याशी चर्चा करावी. चर्चेतून अडचणींवर तोडगा निघतो. मात्र, कर्जाला कंटाळून शेतकर्‍यांनी आत्महत्येसारखे टोकाचे पाऊल उचलू नये, असे भावनात्मक आवाहन या वेळी खोतकर यांनी केले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com