नांदेड: गावच्या मंत्रालयाला शेतकऱ्यांनी ठोकले कुलूप

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 6 जून 2017

नांदेड : शेतकरी संपाच्या सहाव्या दिवशी जिल्ह्यात संपकरी शेतकऱ्यांनी शासकीय कार्यालयाला लक्ष केले. चोख पोलिस बंदोबस्तामुळे मुख्यालयांसह जिल्ह्यातील शासकीय कार्यालयांना छावणीचे स्वरूप आले होते. अर्धापूर तालुक्यातील बॅंकासह तलाठी कार्यालये बंद करण्यात आली.

शेलगाव येथील ग्रामपंचायतीला शेतकऱ्यांनी कुलूप ठोकले. उमरी येथे तहसील कार्यालयाला कुलूप ठोकण्याचा प्रयत्नातील संपकरी शेतकऱ्यांना पोलिसांनी अटक केली. लोहा, कंधार, भोकर, मुदखेड, बिलोली, नायगाव तालुक्यात काही ठिकाणी तलाठी सज्जांना कुलूप ठोकून शासकीय कार्यालये बंद आंदोलन करण्यात आले.

शेतकऱ्यांना कर्जमुक्ती, शेतीमालाला खर्चाच्या तुलनेत ५० टक्के अधिक हमी भाव, स्वामीनाथन आयोगाच्या शिफारसी लागू करा यासह इतर मागण्यासाठी राज्यभरातला शेतकरी गुरुवारपासून संपावर आहे. गेल्या पाच दिवसांपासून जिल्ह्यातला शेतकरी संपात स्वयंस्फूर्तीने सहभागी होत आहे. संपावर ठाम असल्याचे सांगत किसान क्रांती सेनेतर्फे संपाची दिशा ठरवण्यात आली. संपकाळात शहरांचा दूध, फळे, भाजीपाला पुरवठा बंद करण्यासाठी ग्रामीण भागातील शेतकऱ्यांनी वाहने आडवून दूध, फळे, भाजीपाला रस्त्यावर टाकण्यात आला. ग्रामीण भागातील आठवडे बाजारातून शहराला दूध, फळे, भाजीपाल्याचा पुरवठा होऊ नये, या उद्देशाने अनेक आठवडे बाजार बंद करण्यात आले.

शेतकरी संपाच्या पाचव्या दिवशी रास्ता रोकोला जिल्ह्यातील अर्धापूर, लोहा, कंधार, मुदखेड, उमरी आदी तालुक्यातून प्रतिसाद मिळाला. मुदखेड तालुक्यातील जांब (बुद्रूक) येथील शेतकऱ्यांनी रस्त्यावर दूध ओतून सरकारचा प्रतिकात्मक पुतळा जाळून निषेध केला. भोकर फाट्यावर संतप्त आंदोलकांना सहा एसटी बसच्या काचा फोडल्या. रास्ता रोको दरम्यान संपकरी शेतकऱ्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व सदाभााऊ खोत यांचे प्रतिकात्मक पुतळे जाळण्यात आले.

किसान क्रांती सभेच्या वतीने ठरवण्यात आलेल्या शेतकरी संपाच्या दिशेनुसार सहाव्या दिवशी मंगळवारी अर्धापूर तालुक्यातील तलाठी कार्यालये बंद करण्यात आले. बॅंकासह शासकीय कार्यालयांना मोठा पोलिस बंदोबस्त लावण्यात आला होता. शेलगाव येथील शेतकरी ग्रामस्थांनी ग्रामपंचायतीला कुलूप ठोकले. उमरी येथे तहसील कार्यालयास कुलूप ठोण्याच्या प्रयत्नातील आंदोलनकर्त्या शेतकऱ्यांना पोलिसांनी अटक केली. शेतकरी संपाच्या शासकीय कार्यालय बंद आंदोलनाच्या पार्श्‍वभूमीवर शहरातील जिल्हाधिकारी कार्यालय, जिल्हा परिषद, तहसील कार्यालयांना परिसरातील चोख बंदोस्तामुळे छावणीचे स्वरूप आले होते. संपाच्या सातव्या दिवशी बुधवारी (ता. सात) खासदार, आमदारांच्या कार्यालयांना कुलूप ठोकण्याचा इशारा देण्यात आला आहे.