वॉर्डातला कचरा वॉर्डातच, प्रकियेद्वारे पाचशे टन गांडूळ खत तयार 

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 25 फेब्रुवारी 2017

औरंगाबाद - वॉर्डात तयार होणाऱ्या कचऱ्यावर वॉर्डातच प्रक्रिया करून प्रभाग क्रमांक चारमध्ये सुमारे 500 टन गांडूळ खत तयार करण्यात आले आहे. यापैकी 35 टन खत शेतकऱ्यांना मोफत देण्यात आले आहे. दररोज नारेगावच्या कचरा डेपोकडे जाणारा 13 टन कचरा कमी झाला आहे. 

महापालिकेचे तत्कालीन प्रभारी आयुक्‍त सुनील केंद्रेकर यांनी "सीआरटी'सोबत सामंजस्य करार करून "माझी सिटी टकाटक' अभियान सुरू केले. "सीआरटी'च्या प्रशिक्षणामुळे स्वच्छता निरीक्षक, सफाई जवान व सफाई मजूर लोकजागृती करण्यासाठी तयार झाले. सीआरटी व श्री. केंद्रेकर यांच्या प्रोत्साहनामुळे प्रभाग चारमध्ये यादवनगर, सुदर्शननगर, रोजाबाग, स्वामी विवेकानंदनगर, श्रीकृष्णनगर, पवननगर या वॉर्डांत घंटागाडीने शंभर टक्‍के डोअर टू डोअर कचरा संकलन केले जाते, या वॉर्डांमध्ये 118 कचराकुंड्या होत्या. आज एकही कचराकुंडी ठेवण्यात आलेली नाही. याशिवाय शहीद भगतसिंगनगर, वानखेडेनगर, एकतानगर या वॉर्डांतून ओला-सुका कचरा संकलित केला जातो. संकलित कचऱ्याचे खत तयार करण्यासाठी सिडको एन- 12, एन- 11 भाजीमंडई, फरशी मैदान, एकता कॉलनी व सावंगी तलावाजवळ खड्डे तयार करण्यात आले आहेत. 35 टन खत शेतकऱ्यांना मोफत देण्यात आले आहे. शेतकऱ्यांनी फक्‍त ट्रॅक्‍टर घेऊन यावे. त्यांना महपालिकेतर्फे "जेसीबी'ने मोफत खत दिले जाते. हेच खत हर्सूल तलावाजवळील स्मृतिवनात व महापालिकेच्या उद्यानांमध्ये वापरण्यात येते. 

Web Title: Five hundred tons of fertilizer annulose prepared by process