औरंगाबादेतून चौथ्यांदा हृदयाचा प्रवास

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 22 जून 2016

औरंगाबाद - अवयवदानाचे केंद्र म्हणून पुढे आलेल्या औरंगाबाद येथून हृदयाचा चौथ्यांदा प्रवास झाला आहे. मंगळवारी (ता. 21) मेंदूचे काम थांबलेल्या युवकाच्या अवयवदानातून चौघांना जीवदान मिळाले. प्रथमच शहरातील डॉक्‍टरांनी हृदय काढून मुंबई येथे घेऊन जात प्रत्यारोपणही केले, अशा प्रकारचा हा मराठवाड्यातील पहिलाच प्रयोग ठरला आहे. 

वैजापूर तालुक्‍यातील माळी घोगरगाव येथील संतोष कारभारी गुंड या (वय 33) युवकाचा रविवारी सायंकाळी सातच्या सुमारास वाळूज औद्योगिक वसाहतीत अपघात झाला. त्यांना तातडीने येथील युनायटेड सिग्मा हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले; मात्र डोक्‍याला गंभीर दुखापत झाल्याने मेंदूवर सूज आली आणि मेंदूचे काम थांबले. त्यानंतर वैद्यकीय समाजसेवक संदीप चव्हाण यांनी गुंड कुटुंबीयांचे समुपदेशन करून अवयवदानाचे महत्त्व पटवून सांगितले. त्यानंतर जवळपास चार तासांनी घरच्या मंडळींनी अवयवदानास संमती दिली. याबद्दल डॉ. उन्मेष टाकळकर म्हणाले, ""गुंड यांच्या कुटुंबीयांनी अवयवदान सहकार्य केल्यामुळे चार जणांना जीवदान मिळाले आहे. मंगळवारी पहाटे तीनच्या सुमारास अवयव काढण्यास सुरवात केली. साडेसहा वाजता हृदय बाहेर काढण्यात आले. विशेष म्हणजे आतापर्यंत हृदय काढण्यासाठी जेथे हृदय पाठवायचे आहे, तेथील हृदय शल्यचिकित्सकाला यावे लागत असे. मात्र प्रथमच येथील डॉ. आनंद देवधर यांनी हृदय काढण्याचे काम केले. तसेच मुंबईत जाऊन प्रत्यारोपणाच्या कामातही सहभाग घेतला. तर गुंड यांचे यकृत पुणे येथील सह्याद्री हॉस्पिटल येथे सकाळी साडेसातच्या सुमारास पाठविण्यात आले. एक किडनी कमलनयन बजाज हॉस्पिटलमधील रुग्णाला, तर दुसरी सेठ नंदलाल धूत हॉस्पिटलमधील रुग्णास देण्यात आली. संतोष यांच्या अवयवदानातून चौघांना जीवदान मिळाले आहे.‘‘ 

फोटो गॅलरी