विसर्जनानंतर गावी परतणारे तिघे मित्र अपघातात ठार

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 7 सप्टेंबर 2017

गेवराई - कार- ट्रकच्या समोरासमोर झालेल्या धडकेत कारमधील तिघे मित्र ठार झाले. धुळे - सोलापूर महामार्गावरील रांजणी (ता. गेवराई) गावाजवळ मंगळवारी रात्री पावणेबाराच्या सुमारास ही दुर्घटना घडली. संबंधित तिघे गणेश मूर्ती विसर्जन करून गावाकडे परतत होते.

टाकळगाव (ता. गेवराई) येथील अविनाश सुदाम गव्हाणे (वय 47), बजरंग निवृत्ती ढोणे (48, ), पाटील दादाराव मुंजाळ (48, दोघे रा. हिरापूर) हे मित्र हिरापूरमध्ये विसर्जन मिरवणुकीत सहभागी झाले होते. गणेश मूर्तीचे विसर्जन केल्यानंतर ते कारने गेवराईकडे परतत होते. अविनाश गव्हाणे यांची ही कार (एमएच 43 डी 1188) तेच चालवित होते. धुळे - सोलापूर महामार्गावरील रांजणी येथे रात्री पावणेबाराच्या सुमारास येताच भोकरदन येथून मका भरून बीडकडे जाणारा ट्रक (एमएच 20 एपी 9797) व कारची समोरासमोर धडक झाली. या अपघातात चालक अविनाश गव्हाणे जागीच ठार झाले, तर बजरंग ढोणे व पाटील मुंजाळ गंभीर जखमी झाले. बीड जिल्हा रुग्णालयात दाखल केले असता डॉक्‍टरांनी दोघांना मृत घोषित केले.