वसमत तालुक्‍यात मुलीवर अत्याचार

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 24 एप्रिल 2018

वसमत - बदनामी करण्याची धमकी देऊन अल्पवयीन मुलीस पळवून नेत अत्याचार केल्याप्रकरणी दोघांविरुद्ध वसमत ग्रामीण पोलिस ठाण्यात आज बाललैंगिक अत्याचार प्रतिबंधक कायद्याअंतर्गत (पॉक्‍सो) गुन्हा दाखल झाला आहे.

वसमत - बदनामी करण्याची धमकी देऊन अल्पवयीन मुलीस पळवून नेत अत्याचार केल्याप्रकरणी दोघांविरुद्ध वसमत ग्रामीण पोलिस ठाण्यात आज बाललैंगिक अत्याचार प्रतिबंधक कायद्याअंतर्गत (पॉक्‍सो) गुन्हा दाखल झाला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तालुक्‍यातील मुरुंबा येथील अल्पवयीन मुलगी शुक्रवारी (ता. 20) घरात एकटी असताना गावातील गुंडप्पा हुलगुंडे (वय 22) हा तिच्या घरात शिरला. त्यानंतर तिला बदनाम करण्याची धमकी देत त्याने तिला दुचाकी वाहनावर बसवून पळवून नेले व अत्याचार केले. गुंडप्पाच्या वडिलांनी मुलीच्या कुटुंबीयांना ठार मारण्याची धमकी दिली. या घटनेची गावात वाच्यता झाल्यानंतर गुंडप्पाने त्या मुलीला शनिवारी (ता. 21) गावात आणून सोडले. आज सकाळी त्या मुलीच्या कुटुंबीयांना मुलीसह वसमत ग्रामीण पोलिस ठाणे गाठून याबाबतची तक्रार दिली. यावरून वसमत ग्रामीण पोलिसांनी गुंडप्पा हुलगुंडे व त्याच्या वडिलाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Web Title: girl atrocity in vasmat tahsil crime