कन्नडला बालिकेचा मृत्यू 

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 24 मार्च 2017

कन्नड  - शहरात सात महिन्यांच्या बालिकेचा मृत्यू झाल्याने नातेवाइकांनी रुग्णालय व औषधालयाची तोडफोड केल्याची घटना गुरुवारी (ता. 23) घडली. या प्रकरणी तोडफोड करणाऱ्यांविरोधात कन्नड पोलिस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला. दरम्यान, मुलीच्या पालकांनीही पोलिसांत डॉक्‍टरविरुद्ध रात्री उशिरा तक्रार दाखल केली. 

कन्नड  - शहरात सात महिन्यांच्या बालिकेचा मृत्यू झाल्याने नातेवाइकांनी रुग्णालय व औषधालयाची तोडफोड केल्याची घटना गुरुवारी (ता. 23) घडली. या प्रकरणी तोडफोड करणाऱ्यांविरोधात कन्नड पोलिस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला. दरम्यान, मुलीच्या पालकांनीही पोलिसांत डॉक्‍टरविरुद्ध रात्री उशिरा तक्रार दाखल केली. 

याबाबत माहिती अशी, की शहरातील अमिना तजीब बेग (वय सात महिने) हिला उपचारासाठी मंगळवारी (ता. 21) शहरातील लक्ष्मी हॉस्पिटल येथे दाखल करण्यात आले. डॉ. नीलेश जैस्वाल यांनी तिच्यावर उपचार करून तिला घरी पाठविले; मात्र गुरुवारी अमिनाची प्रकृती पुन्हा बिघडल्याने तिला लक्ष्मी हॉस्पिटलमध्ये नेण्यात आले. राज्यभरात डॉक्‍टरांचा संप असल्याने रुग्णालय बंद होते. त्यामुळे पालकांनी तिला उपचारासाठी औरंगाबादला नेले. तेथे डॉक्‍टरांनी तिला तपासून मृत घोषित केले. ही माहिती कन्नड येथील नातेवाइकांना कळाली. त्यांनी लक्ष्मी हॉस्पिटल व बालाजी मेडिकलची तोडफोड केली. 

लक्ष्मी हॉस्पिटल येथे नोकरीस असलेले गोकुळलाल बन्सीलाल जैस्वाल यांनी कन्नड शहर पोलिस ठाण्यात फिर्याद दिली. त्यात म्हटले आहे, की गुरुवारी (ता. 23) डॉक्‍टरांचा संप असल्याने रुग्णालय बंद होते. दुपारी सव्वातीनच्या सुमारास शटर उघडण्याचा व काचा फुटण्याचा आवाज आला. श्री. बेग, त्यांचे बंधू व 12 ते 15 लोकांचा जमाव दगड व लोखंडी सळईने हॉस्पिटलची तोडफोड करीत होते. त्यांनी मला ठार मारण्याची धमकी दिली व फोन न करण्याबाबत दमदाटी केली. त्यांनी रुग्णालयातील टीव्हीचे स्टॅण्ड, रिसेप्शन टेबल, वैद्यकीय उपकरणे, बाळाचे वजन करण्याचे यंत्र, तपासणी टेबल, आयसीयू रूमच्या काचा, मेडिकलमधील फ्रीज, कॉम्प्युटर आदी साहित्याची तोडफोड करून तीन ते चार लाखांचे नुकसान केले. जमावाने मेडिकलमध्ये जाऊन गल्ल्यातील रक्कम घेऊन गेले. दरम्यान, घटनेनंतर डॉ. नीलेश जैस्वाल व सचिन जैस्वाल घटनास्थळी आले. दरम्यान, घटनेच्या निषेधार्थ कन्नड शहर व तालुक्‍यात रुग्णालये बंद ठेवण्याचा निर्णय डॉक्‍टरांच्या संघटनेने घेतला आहे. 

Web Title: girl death in kannad

टॅग्स