हर्सूलच्या यात्रेतून मुलीचे अपहरण

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 12 ऑक्टोबर 2016

औरंगाबाद - हर्सूल यात्रेतून मुलीचे अपहरण केल्याची फिर्याद यात्रेतील खेळणे विक्री करणारे हरिश्‍चंद्र वाघ (रा. पाटेगाव ता. पैठण) यांनी शनिवारी (ता. ८) हर्सूल पोलिसांत दिली. 

औरंगाबाद - हर्सूल यात्रेतून मुलीचे अपहरण केल्याची फिर्याद यात्रेतील खेळणे विक्री करणारे हरिश्‍चंद्र वाघ (रा. पाटेगाव ता. पैठण) यांनी शनिवारी (ता. ८) हर्सूल पोलिसांत दिली. 

श्री. वाघ यांनी हर्सूलच्या हरसिद्धी माता मंदिर येथे यात्रेत लहान मुलांचे खेळण्याचे दुकान लावून विक्री करीत असता मंदिरात प्रसाद वाटपाच्या कार्यक्रमादरम्यान मुलगी अंजली वाघ (वय ३) शुक्रवारी (ता. ७ ऑक्‍टोबर) सायंकाळी सहा वाजता गेली होती. ती रात्री १० वाजेपर्यंत सापडली नाही, अंजलीला अज्ञात व्यक्तीने फूस लावून पळवून नेल्याचेही श्री. वाघ यांनी तक्रारीत म्हटले आहे. अंजलीची उंची दोन फूट, रंग गोरा, केस काळे, बॉब कट, चेहरा लांब, डोळे काळे, नाक सरळ, अंगात निळ्या रंगाची सलवार, गुलाबी रंगाचा फ्रॉक, हातात लाल रंगाच्या फायबरच्या बांगड्या आहेत. अशा वर्णनाची मुलगी आढळल्यास पोलिसांत कळविण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

टॅग्स

मराठवाडा

नांदेड - प्रगतिशील लेखकसंघ, उद्याचा मराठवाडा आणि मौर्य प्रतिष्ठानच्या विद्यमाने रविवारी (ता. 25) पाचवे डॉ. बाबासाहेब आंबेडकर...

शनिवार, 24 जून 2017

नांदेड - शहरातील रस्त्यांवर वेगवेगळ्या हातगाड्यांवर किंवा अन्य ठिकाणी बालकामगार काम करत असल्याचे चित्र दिसत आहे. त्यामुळे...

शनिवार, 24 जून 2017

नांदेड: एका अल्पवयीन युवतीस लग्नाचे आमिष दाखवून तिचे अपहरण करणाऱ्या युवकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सदर युवतीचे अपहरण...

शनिवार, 24 जून 2017