विद्यार्थीनीवर तिघांचा अत्याचार; गर्भपात केल्याची तक्रार

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 17 मे 2017

हिंगोली: तालुक्‍यातील नर्सी येथे एका विद्यार्थीनीचे छायाचित्र काढून इतरांना दाखविण्याची धमकी देऊन अत्याचार करणाऱ्या तिघांवर नर्सी पोलिस ठाण्यात मंगळवारी (ता.16) रात्री उशीरा गुन्हा दाखल झाला आहे. या प्रकरणात गोळ्या देऊन गर्भपात झाल्याचेही तक्रारीत नमुद केले आहे.

हिंगोली: तालुक्‍यातील नर्सी येथे एका विद्यार्थीनीचे छायाचित्र काढून इतरांना दाखविण्याची धमकी देऊन अत्याचार करणाऱ्या तिघांवर नर्सी पोलिस ठाण्यात मंगळवारी (ता.16) रात्री उशीरा गुन्हा दाखल झाला आहे. या प्रकरणात गोळ्या देऊन गर्भपात झाल्याचेही तक्रारीत नमुद केले आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तालुक्‍यातील नर्सी येथील एका विद्यार्थीनीचे गावातील तानाजी सदाशीव लाड याने भ्रमणध्वनीवर छायाचित्र काढले होते. सदर छायाचित्र इतरांना दाखवितो अशी धमकी देऊन तिला शेतात नेऊन तिच्यावर अत्याचार केला. यावेळी पांडूरंग कऱ्हाळे (रा. जोडतळा) याने चित्रफित काढून सदर चित्रफित इतरांना दाखवितो अशी धमकी देऊन तिला परभणी येथे तसेच पुणे येथे नेऊन तिच्यावर अत्याचार केला. यामधे सदर विद्यार्थीनी गर्भवती राहिल्याने तिला संतोष सदाशिव लाड (रा. नर्सी) याच्या मदतीने गर्भपाताच्या गोळ्या देऊन गर्भपात केला. सदर प्रकार कोणाला सांगितल्यास चित्रफित इतरांना दाखवून बदनामी करण्याची तसेच जिवे मारण्याची धमकीही दिली. तसेच तिला 13 मे रोजी बळजबरीने ताब्यात ठेवले.

या प्रकारामुळे विद्यार्थीनी घाबरून गेली, तिने हा प्रकार तिच्या घरच्या मंडळींना सांगितल्यानंतर मंगळवारी (ता. 16) रात्री उशीरा या प्रकरणी तिने नर्सी पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली. यावरून पोलिसांनी वरील तिघांवर गुन्हा दाखल केला आहे. पोलिस उपाधिक्षक सुजाता पाटील, पोलिस निरीक्षक मधुकर कारेगावकर यांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली आहे.

दरम्यान, या प्रकरणात पुणे येथे तीन वेळेस गर्भपात केल्याचे नमुद करण्यात आले आहे. त्यामुळे गर्भपाताच्या गोळ्या कुठून आणल्या व पुणे येथे कुठे गर्भपात केला याचा स्वतंत्र तपास पोलिसांना करावा लागणार आहे.