ग्रामसेवकांचे असहकार आंदोलन सुरू

ग्रामसेवकांचे असहकार आंदोलन सुरू

हिंगोली : कळमनुरी येथील गट विकास अधिकारी मनोहर खिल्लारी रुजू झाल्यामुळे ग्रामसेवक संघटनेने तात्पुरते स्थगित केलेले असहकार आंदोलन मंगळवारपासून ( ता. २५ ) पून्हा सुरू केले आहे.  

जिल्हा ग्रामसेवक संघटनेने विविध मागण्यांसाठी जिल्हा परिषदेकडे निवेदन सादर केले होते. यामध्ये कळमनुरी येथील गट विकास अधिकाऱ्यांनी वर कारवाई करावी, अंशदायी सेवानिवृत्ती योजनेच्या कपातीचा हिशोब द्यावा, आदर्श ग्रामसेवक पुरस्काराची घोषणा करावी आदी प्रमुख मागण्यांचा समावेश होता. या मागण्यासाठी ग्रामसेवक संघटनेने असहकार आंदोलन सुरू केले होते. या आंदोलनामध्ये प्रशासनाच्या सर्वच बैठकांवर बहिष्कार टाकण्यात आला होता. तर गावपातळीवरील माहिती देखील प्रशासनाला देण्यात आली नाही. त्यानंतर जिल्हा परिषदेने ग्रामसेवक संघटनेच्या मागण्यांची सोडवणूक करण्यास सुरुवात केली. तसेच कळमनुरीचे गटविकास अधिकारी मनोहर खिल्लारी हेदेखील रजेवर गेले. त्यामुळे ग्रामसेवक संघटनेने तारीख 28 ऑगस्ट रोजी हे आंदोलन तूर्तास स्थगित करण्यात आल्याचे पत्र देऊन कामाला सुरुवात केली. मात्र गटविकास अधिकारी रुजू झाल्यास पुन्हा आंदोलन सुरू केली जाईल असेही या पत्रात नमूद केले होते.

दरम्यान गट विकास अधिकारी श्री. खिल्लारी हे नुकतेच सुरू झाले असून ग्रामसेवक संघटनेने आजपासून आंदोलन सुरू केले आहे. यामध्ये महात्मा गांधी रोजगार हमी योजनेच्या कार्य शाळांवर बहिष्कार टाकला जाणार आहे. ग्रामसेवकांच्या दुसऱ्यांदा सुरू झालेल्या असहकार आंदोलनामुळे प्रशासन पुन्हा एकदा अडचणीत सापडले आहे.

साडेतीनशे ग्रामसेवक सहभागी - दिलीप पांढरे जिल्हाध्यक्ष
गटविकास अधिकारी मनोहर खिल्लारी झाल्यामुळे हे रजेवर गेले होते.  मात्र आता जिल्हा परिषदेने त्यांना रुजू करून घेतले आहे. त्यामुळे जिल्हा परिषदेने आंदोलनास भाग पाडले आहे.  या आंदोलनात जिल्ह्यातील 565 ग्रामपंचायतींचे साडेतीनशे ग्राम सेवक सहभागी झाले आहेत. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com