ग्रामीण भागातील नागरिकांच्या समस्या समजून त्यांना मार्गदर्शन करा

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 24 मे 2017

परभणी - विविध कल्याणकारी योजनांच्या माध्यमातून समाजातील सर्वच घटकांच्या विकासाचे उद्दिष्ट पूर्ण करणे सहज शक्य आहे. यासाठी शासनाच्या विविध योजनांचा लाभ जनतेपर्यंत कसा पोचेल, ग्रामीण भागातील नागरिकांच्या समस्या समजून घेऊन त्यांना योग्य ते मार्गदर्शन करा, भाजपच्या केंद्र व राज्य सरकारने केलेल्या कामांच्या योजनांची माहिती जनतेपर्यंत पोचवा, असे आवाहन पाणीपुरवठा मंत्री बबनराव लोणीकर यांनी मंगळवारी (ता. २३) केले.

परभणी - विविध कल्याणकारी योजनांच्या माध्यमातून समाजातील सर्वच घटकांच्या विकासाचे उद्दिष्ट पूर्ण करणे सहज शक्य आहे. यासाठी शासनाच्या विविध योजनांचा लाभ जनतेपर्यंत कसा पोचेल, ग्रामीण भागातील नागरिकांच्या समस्या समजून घेऊन त्यांना योग्य ते मार्गदर्शन करा, भाजपच्या केंद्र व राज्य सरकारने केलेल्या कामांच्या योजनांची माहिती जनतेपर्यंत पोचवा, असे आवाहन पाणीपुरवठा मंत्री बबनराव लोणीकर यांनी मंगळवारी (ता. २३) केले.

परभणी येथे भारतीय जनता पक्षाच्या शिवार संवाद व विस्तारक कार्यक्रमाचे आयोजन केले होते. या वेळी ते बोलत होते. या वेळी आमदार मोहन फड, अभय चाटे, श्रीनिवास मुंडे, बाबासाहेब जामगे, श्यामसुंदर मुंडे, खंडेराव आघाव, मेघना साकोरे, राजेश देशपांडे, गणेशराव रोकडे, श्री. तांदळे आदींची उपस्थिती होती.

श्री. लोणीकर म्हणाले, आपल्या शेतीतून जास्तीत जास्त उत्पादन घेण्याचा प्रयत्न शेतकरी करतो. त्याच्या मदतीसाठी शासनाने अनेक योजना आणल्या आहेत. या योजना सर्वांनी मिळून शेतकऱ्यांपर्यंत पोचविण्यासाठी उन्नत शेती, समृद्ध शेतकरी अभियान राबविले जात आहे. शेतकरी उत्पादक गटांच्या माध्यमातून गावागावांत अवजार बँकची निर्मिती करण्याचा प्रयत्न या माध्यमातून होणार आहे. प्रधानमंत्री पीक योजनेमध्ये सर्व शेतकऱ्यांना समाविष्ट करून त्यांच्या पिकांना संरक्षण देण्यासाठीही प्रयत्न केले जात आहेत. याची माहिती कार्यकर्त्यांनी शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन शासकीय योजनांची माहिती त्यांना द्यावी. शेतकऱ्यांचा आत्मविश्वास वाढविण्यासाठी प्रयत्न करावा, असे आवाहनही त्यांनी केले. मागेल त्याला शेततळे देण्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी निर्देश दिले असून जिल्ह्यातील प्रत्येक शेतकऱ्याने या योजनेचा लाभ घेत आपल्या शेतात शेततळे करावेत. याची माहिती शेतकरऱ्यांना आपण सांगावी तसेच गाळमुक्त धरण- गाळमुक्त शिवार उपक्रमामुळे गाळातील सत्त्वाचा फायदा पिकाला होऊन उत्पादकतेत भरमसाठ वाढ होणार आहे. गाळ वाहून नेण्यासाठी वाहतुकीचा खर्च शासन करणार आहे, आता फक्त या कार्यक्रमाला लोकांचा आधार लागणार आहे. यामुळे यावर्षी तलाव- प्रकल्पांत दुप्पट पावसाचे पाणी साठणार असल्यामुळे शेतकऱ्यांनी याचाही फायदा घेण्याचे आवाहन त्यांनी केले.

मराठवाडा

पूर्णा (परभणी): तालुक्यातील बरबडी येथील लक्ष्मण गणेश सोलव या बावीस वर्षीय अल्पभूधारक शेतकऱ्यांने कर्जबाजारीपणामुळे गळफास घेऊन...

मंगळवार, 19 सप्टेंबर 2017

मराठवाडा जनता विकास परिषदेच्या पाठपुराव्याला यश औरंगाबाद : दमणगंगेचे पन्नास टीएमसी (50 अब्ज घनफुट) पाणी गोदावरी खोऱ्यात सोडून...

मंगळवार, 19 सप्टेंबर 2017

लोहा : बैलगाडा घेऊन शेतीकामाला जात असताना बैलगाडा उलथून झालेल्या अपघातात शेतमजुराचा मृत्यू झाला. ही घटना हिप्परगा गावालगतच्या...

मंगळवार, 19 सप्टेंबर 2017