'अल्पसंख्याक समाजातील विद्यार्थ्यानी शिक्षण घ्यावे'

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 23 मे 2017

झारखंड राज्याचे अल्पसंख्याक आयोगाचे उपाध्यक्ष गुरूविंदरसिंग सेठी

नांदेड: अल्पसंख्याक समाजातील विद्यार्थ्यांनी शिक्षणाच्या प्रवाहात यावे. तसेच राज्यघटनेने दिलेले अधिकार व कर्तव्य जबाबदारीने सांभाळावे असे आवाहन झारखंड राज्याचे अल्पसंख्याक आयोगाचे उपाध्यक्ष गुरूविंदरसिंग सेठी यांनी पत्रकार परिषदेत केले.

सचखंड गुरूद्वाराचे दर्शन घेण्यासाठी सरदार सेठी हे परिवारसह नांदेड दौऱ्यावर आले असता सचखंड गुरूद्वारात ते पत्रकारांशी बोलत होते. यापूर्वी नांदेडला येण्याचे भाग्य मला गुरूता गद्दी या त्रिशताब्दी सन 2008 मध्ये लाभले होते. त्यानंतर मी परत दुसऱ्यांदा या पवित्र भुमीत आलो आहे. तब्बल 9 वर्षात नांदेड शहरात अमुलाग्र बदल झालेला आहे. सचखंड गुरूद्वाराचे सर्व संत, कार्यालयीन अधिकारी, कर्मचारी यांच्यातील समन्वय यामुळे विकास साध्य झाला. तसेच सुवर्णकलश यात भर पडली असून देश विदेशातील शिख धर्मियांचे हे पवित्र स्थान आहे. या पवित्र स्थळाला कुठलेच गालबोट लागु नये यासाठी सर्वांच्या सतर्कतेची आवश्‍यकता आहे.

अल्पसंख्याक समाजातील विद्यार्थ्यांनी शिक्षणाच्या प्रवाहात आले पाहिजे. कारण शिक्षण घेतल्याशिवाय कुठल्याच व्यक्तीची प्रगती नाही. या समाजातील विद्यार्थ्यांना शिष्यवृती, वसतीगृह व शैक्षणीक साहित्य मोफत दिल्या जाते. याचा फायदा घेतला पाहिजे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा सबका विकास सबका साथ हे ब्रिद घेऊन देशभर आम्ही प्रयत्न करीत आहोत.

यावेळी संत बाबा बलविंदरसिंग व संत बाबा नरेद्रसिंग व गुरूद्वाराचे संत बाबा कुलवंतसिंग यांचेही परिश्रम महत्वाचे आहेत. यावेळी गुरूद्वाराचे ओएसडी डी. पी. सिंग, प्रभारी अधिक्षक ठाणसिंग बुंगई यांची उपस्थिती होती.