शिवसेनेचा हिंदू शक्ती मोर्चा शांततेत

शिवसेनेचा हिंदू शक्ती मोर्चा शांततेत

औरंगाबाद - दंगेखोरांना अटक व हिंदूंना सुरक्षेची हमी द्यावी, या मागणीसाठी शिवसेनेने पोलिस परवानगी नसतानाही शनिवारी (ता. १९) शहरातून शांततेत हिंदू शक्ती मोर्चा काढला.  दरम्यान, मोर्चाच्या सुरवातीलाच कार्यकर्त्यांना अटक केल्यानंतर मोर्चा सरस्वती भुवन प्रशालेच्या मैदानावर वळवून तेथे समारोप करण्यात आला. त्यानंतर अटक केलेल्यांची सुटका केल्याचे पोलिसांनी म्हटले आहे. तर शिवसेनेच्या प्रमुख पदाधिकाऱ्यांनी विभागीय आयुक्तांना निवेदन दिले. त्यात शिवसेनेकडून मोर्चा काढण्यात आल्याचा दावा करण्यात आला. 

सकाळी दहापासून मोर्चेकरी पैठणगेट परिसरात जमत होते. मोठ्या संख्येने शिवसैनिक व महिला कार्यकर्त्यांच्या उपस्थितीत मोर्चाला बाराच्या सुमारास सुरुवात झाली. त्याआधी दहाच्या सुमारास ड्रोन कॅमेरे फिरवण्यात आले. पोलिस मोर्चेकऱ्यांना ताब्यात घेणार याची चर्चा असल्याने पोलिसांनी निर्माण केलेले दबावतंत्र कामी आले. टिळक पथवरून मोर्चा सरस्वती भुवन शाळेच्या मैदानावर नेण्यात आला. त्याठिकाणी हिंदू शक्ती मोर्चाचा शांततेत समारोप झाला. मोर्चामध्ये शिवसेना नेते खासदार चंद्रकांत खैरे, जिल्हाप्रमुख अंबादास दानवे, नरेंद्र त्रिवेदी, आमदार संजय शिरसाट, महानगरप्रमुख प्रदीप जैस्वाल, महापौर नंदकुमार घोडेले, जितेंद्र महाराज, शिवाजी इंजे, प्रकाश महाराज, नवनाथ महाराज आंधळे, राजू वैद्य, बाळासाहेब थोरात, विकास जैन, ऋषिकेश खैरे, सचिन खैरे, ऋषीकेश जैस्वाल यांच्यासह विविध हिंदुत्ववादी संघटनांच्या कार्यकर्त्यांचा मोठ्या संख्येने सहभाग होता. 

पैठणगेटला  छावणीचे स्वरूप
अनुचित प्रकार टाळण्यासाठी पैठणगेट परिसरात पोलिस आयुक्त, तीन उपायुक्त, पोलिस अधिकाऱ्यांसह, एसआरपीएफ, वज्र, वरुण, दंगा नियंत्रण पथक, क्‍यूआरटी कमांडोंचा तगडा बंदोबस्त होता. त्यामुळे या परिसराला पोलिस छावणीचे स्वरूप आले होते. दरम्यान, या भागात सकाळी दहाच्या सुमारास तासभर मोबाईल इंटरनेट सेवा बंद होती. 

घाबरू नका, शिवसेना तुमच्या पाठीशी - खैरे
शिवसेनाप्रमुखांच्या शिकवणीप्रमाणे हिंदूंचे रक्षण करणे शिवसेनेचे कर्तव्य आहे. आम्ही तेच बजावले. आमच्या घरांवर दगड फेकले, तर गप्प बसणार नाही. घाबरू नका, शिवसेना तुमच्या पाठीशी आहे. मात्र, शिवसेनेने केलेली मदत लक्षात ठेवा, असे आवाहन खासदार खैरे यांनी केले. दंगलीत पेट्रोल, डिझेल, रॉकेल पुरवणारा एमआयएमचा नगरसेवक मतीन याला संध्याकाळपर्यंत अटक करा. तर राजेंद्र जंजाळ, लक्ष्मीनारायण बाखरियांसह हिंदू युवकांची सुटका करण्यासाठी वकिलांची फौज उभी करू, तुम्ही काळजी करू नका, हिंदू दंगलग्रस्तांना शिवसेना मदत करणार असल्याचेही त्यांनी नमूद केले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com