हिंगोली जिल्ह्यात वीज पडून दोन ठार, पाच जखमी

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 6 जून 2017

हिंगोली - हिंगोली जिल्ह्यात सोमवारी (ता. पाच) सायंकाळी वीज पडून दोन युवक ठार, तर अन्य ठिकाणी वीज पडून पाचजण जखमी झाले आहेत. जांबआंध (ता. सेनगाव) येथे तुकाराम रामजी चौरे (वय 18) व सुनील धामणे (18) हे शेतात असताना अचानक वीज कोसळली. या दोघांचा जागेवरच मृत्यू झाला.

अन्य एका घटनेत औंढा नागनाथ तालुक्‍यातील भोसी येथे शेतात काम करताना वीज पडून तीनजण जखमी झाले. यामध्ये रतनबाई शंकर झाटे (45), शंकर कोंडिबा झाटे (50) व परसराम आसोले (65, रा. नागझरी) यांचा समावेश आहे. त्यांच्यावर हिंगोलीच्या जिल्हा रुग्णालयात उपचार सुरू आहेत. नंदगाव (ता. औंढा नागनाथ) येथे महादू मारुती मारकाळ (23) हे वीज पडून जखमी झाले. तर, औंढा नागनाथ येथे राघोजी मारोतराव शिंदे (70) हेही वीज पडून जखमी झाले आहेत.