कर्जबाजारी शेतकऱ्याची बस स्थानकात आत्महत्या 

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 19 जुलै 2017

आखाडा बाळापूर (जि. हिंगोली) - पार्डी खुर्द (ता. वसमत, जि. हिंगोली) येथील शेतकरी रंगराव गणाजी नरवाडे (वय 45) यांनी मंगळवारी बाळापूर येथील बस स्थानकात विष प्राशन करून आत्महत्या केली. 

नरवाडे यांच्यावर विविध बॅंकांचे साडेपाच लाख रुपयांचे कर्ज आहे. नापिकीमुळे ते कर्जफेडीच्या विवंचनेत होते. आज वसमत-बाळापूर असा बस प्रवास करून ते आले आणि विषारी औषध खरेदी केले. सकाळी अकराच्या सुमारास बाळापूरच्या नवीन बस स्थानकात विषारी औषध प्राशन केले. पोलिसांनी त्यांना ग्रामीण रुग्णालयात दाखल केले. उपचार सुरू होण्यापूर्वीच त्यांचे निधन झाले.