हिंगोली जिल्ह्यातील तरुण शेतकऱ्याची आत्महत्या

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 10 जून 2017

औंढा नागनाथ तालुक्‍यातील रामेश्वर येथील 21 वर्षाच्या अविवाहित शेतरकऱ्याने विष पिऊन आत्महत्या केली आहे.

औंढा नागनाथ (जि. हिंगोली) : औंढा नागनाथ तालुक्‍यातील रामेश्वर येथील 21 वर्षाच्या अविवाहित शेतरकऱ्याने विष पिऊन आत्महत्या केली आहे.

लक्ष्मण परसराम दळवे (वय 21) या तरुण शेतकऱ्याने आज (शनिवार) सकाळी साडे सातच्या सुमारास शेतात जातो असे सांगून शेताच्या रस्त्यावरील वाटेत विषारी औषध प्राशन केले. त्यानंतर काही वेळातच त्यांच्यावर विषाचा परिणाम झाला. त्यांना सकाळी साडे दहाच्या सुमारास परभणी येथील रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र तेथे त्यांना मृत घोषित करण्यात आले. दळवे हे अल्पभूधारक शेतकरी होते. त्यांना तीन एकर जमीन आहे. मागील वर्षी वडिलांच्या निधनानंतर कुटुंबांची सर्व जबाबदारी त्यांच्यावर होती. सततचा दुष्काळ, यंदा खत बी-बियाणांच्या खर्चाची त्यांना चिंता होती. बैलजोडी घ्यायलाही पैसे नव्हते. ते गेल्या चार दिवसांपासून याच चिंतेत होते. अखेर आज त्यांनी आपली जीवनयात्रा संपविली. त्यांच्या मृत्युमुळे गावात हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.