हायटेक औद्योगिक वसाहतीत सुरवातीला होणार रुग्णालय, शाळा

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 22 एप्रिल 2018

औरंगाबाद - औरंगाबाद इंडस्ट्रियल सिटी अर्थात ऑरिकच्या बिडकीन नोडच्या पहिल्या टप्प्याचे काम डिसेंबरपर्यंत पूर्ण करण्यात येणार आहे. एक हजार हेक्‍टरच्या पहिल्या टप्प्यात शाळा, रुग्णालये आणि पेट्रोलपंपांसारख्या सुविधांची उभारणी केली जाणार आहे. 

औरंगाबाद - औरंगाबाद इंडस्ट्रियल सिटी अर्थात ऑरिकच्या बिडकीन नोडच्या पहिल्या टप्प्याचे काम डिसेंबरपर्यंत पूर्ण करण्यात येणार आहे. एक हजार हेक्‍टरच्या पहिल्या टप्प्यात शाळा, रुग्णालये आणि पेट्रोलपंपांसारख्या सुविधांची उभारणी केली जाणार आहे. 

औरंगाबाद इंडस्ट्रियल सिटीच्या शेंद्रा आणि बिडकीन नोडमध्ये पायाभूत सुविधांची कामे सध्या सुरू आहेत. सध्या तीनपैकी एक हजार हेक्‍टरवर पायाभूत सुविधांची उभारणी करण्यात येत आहे. पहिल्या टप्प्यातील २० टक्के कामे ३१ मे २०१८ पर्यंत पूर्ण करण्याचे ध्येय एलएनटी कंपनीला देण्यात आले आहे. हे उद्दिष्ट वेळेपूर्वी पूर्ण करण्याचा प्रयत्न सध्या कंपनीतर्फे सुरू आहे. पहिल्या टप्प्यात औरंगाबाद-पैठण रस्त्यालगत असलेल्या भागाचे काम हाती घेण्यात आले असून यात अँकर प्रकल्पाला ५०० एकरापर्यंतचा भूखंड अन्य भूखंडांच्या एकत्रीकरणातून दिला जाऊ शकतो. सर्व सुविधांनी युक्‍त या हायटेक औद्योगिक वसाहतीत पहिल्या टप्प्यात शाळा, रुग्णालय, पेट्रोलपंपांसह भूमिगत लाइन्स, सिव्हरेज, स्टॉर्म वॉटर यंत्रणा तयार करण्याचे काम सध्या सुरू आहे. या टप्प्यात रहिवासी आणि प्रकल्पग्रस्तांसाठीही प्लॉट राखीव ठेवण्यात आल्याची माहिती पत्रकारांना देण्यात आलेल्या सादरीकरणातून देण्यात आली.

प्राथमिक कामे
जलाशयांचे आणि नाल्यांचे सौंदर्यीकरण.  
२ ते ५ एकर प्लॉटचा समावेश.  
स्वस्त घरांच्या वसाहती, वर्गवारीने भूखंड वाटप. 
आयसीटी, पाइपलाइन जमिनीखाली  
४०० केव्हीचे सबस्टेशन

Web Title: hospital and school will start at the beginning in HiTech Industrial Colony