मतदान करणाऱ्यांना हॉटलेच्या बिलात सवलत

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 4 एप्रिल 2017

परभणी - महापालिका निवडणुकीत मतदानाची टक्केवारी वाढावी व योग्य उमेदवार निवडून यावेत, यासाठी हॉटेल व्यावसायिकांनी पुढाकार घेतला आहे. जे मतदार मतदान करतील त्यांना जेवणाच्या बिलात 25 टक्के सूट देण्याचा निर्णय घेतला आहे.

परभणी महापालिकेच्या निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर झाला आहे. मतदान 19 एप्रिल रोजी मतदान होणार आहे. त्यामध्ये मतदान करणाऱ्या नागरिकांना 19 व 20 एप्रिल रोजी भोजनाच्या बिलात 25 टक्के सूट दिली जाणार आहे. त्या संबंधीचे लेखी पत्र शनिवारी (ता.1) या व्यावसायिकांनी आयुक्त राहुल रेखावार यांना दिले आहे. शहरातील नागरिकांनी मतदान करून या सेवेचा लाभ घ्यावा, असे आवाहन आयुक्‍त रेखावार यांनी केले आहे.