बेकायदा पार्किंगने गुदमरले रस्ते

माधव इतबारे
बुधवार, 11 एप्रिल 2018

औरंगाबाद - शहरात दुचाकी, चारचाकी वाहनांच्या संख्येत दिवसागणिक वाढ होत असताना दुसरीकडे पार्किंगची समस्या महापालिका, पोलिसांच्या दुर्लक्षामुळे गंभीर बनली आहे. मोठा गाजावाजा करून सुरू करण्यात आलेल्या ‘पे ॲण्ड पार्क’ची काही वर्षांतच पुरती वाट लागली; तर फुटपाथला हजारो हातगाड्यांचा विळखा पडत आहे. त्यामुळे रस्त्यावर होणारी वाहनांची पार्किंग व हातगाड्यांच्या अतिक्रमणात मुख्य बाजारपेठेतील रस्ते हरवल्याचे चित्र शहरात आहे.

जिल्ह्यात सुमारे ११ लाख वाहने असल्याची नोंद प्रादेशिक परिवहन विभागाकडे आहे. त्यातील ७० ते ८० टक्के वाहने शहरात असून, पार्किंगचे नियोजन नसल्याने या वाहनांचा भार सध्या रस्त्यांवरच आहे. मुख्य बाजारपेठ, जालना रोड; तसेच नवीन व जुना मोंढा भागात दररोज हजारो वाहनांची दररोज ये-जा असते. ही वाहने सध्या सर्रासपणे रस्त्याशेजारी उभी केली जातात. त्यामुळे अर्धा रस्ता वाहतुकीसाठी बंद होतो. अनेक रस्त्यांवर पी-वन, पी-टू पार्किंगसुद्धा नाहीत. त्यामुळे अस्ताव्यस्त वाहने उभी केली जात आहेत. बेकायदा पार्किंगला शिस्त लावण्यासाठी वाहतूक पोलिस व महापालिकेतर्फे संयुक्तपणे मोहीम राबविण्यात येते; मात्र त्यात केवळ दुचाकी वाहनधारकांना टार्गेट केले जाते. चारचाकी वाहने मात्र रस्ता आमच्या मालकीचा या आविर्भावात उभी राहतात. त्यामुळे वाहतुकीचा बोजवारा उडत आहे. मोठा गाजावाजा करून तत्कालीन महापालिका आयुक्त तथा विद्यमान विभागीय आयुक्त डॉ. पुरुषोत्तम भापकर यांनी ‘पे ॲण्ड पार्क’ संकल्पना सुरू केली होती. काही वर्षांतच संकल्पना धुळीस मिळाली. सध्या अस्तित्वात असलेल्या पार्किंगच्या जागांमध्ये कंत्राटदारांची मनमानी सुरू असल्याने तिकडे कोणी फिरकत नसल्याचे चित्र आहे.

बहुमजली पार्किंगचे दाखविले स्वप्न 
महापालिकेने शहरात बीओटी तत्त्वावर बहुमजली पार्किंग उभारण्याचे स्वप्न दाखविले; मात्र ते अद्याप प्रत्यक्षात उतरलेले नाही. कृषी उत्पन्न बाजार समितीच्या परिसरात वाहतूकनगर विकसित करण्याच्या महापालिकेच्या घोषणा हवेतच विरल्या आहेत. 

जागा गिळंकृत, महापालिकेची डोळेझाक 
महापालिकेकडून बांधकाम परवानगी घेताना पार्किंगची जागा दाखवून नंतर त्या ठिकाणी अतिक्रमण करण्यात आल्याचे अनेक प्रकार शहरात उघडकीस आले होते. पार्किंगच्या गिळंकृत करण्यात आलेल्या जागा मोकळ्या करण्याचे आदेश न्यायालयाने दिले होते, त्याकडेही महापालिकेने डोळेझाक केली आहे.

Web Title: illegal parking road encroachment crime