मराठवाड्यातील पाणीसाठ्यात वाढ

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 29 सप्टेंबर 2016

औरंगाबाद - मराठवाड्यात आतापर्यंत झालेल्या पावसामुळे लहान-मोठ्या प्रकल्पांतील पाणीसाठ्यात लक्षणीय वाढ झाली आहे. 

गेल्यावर्षी विभागातील 11 मोठ्या प्रकल्पांत 15.59 टक्के उपयुक्त पाणीसाठा होता. यंदा 26 सप्टेंबरपर्यंत हे प्रमाण 59.06 टक्‍क्‍यांवर गेले आहे; तसेच 75 मध्यम प्रकल्पांत गेल्यावर्षी 15 ऑक्‍टोबरला 18 टक्के उपयुक्त पाणीसाठा होता. यंदा 26 सप्टेंबरपर्यंत हे प्रमाण 73 टक्‍क्‍यांवर गेले आहे. 732 छोट्या प्रकल्पांत गतवर्षी 11 टक्के पाणीसाठा होता. यंदा हे प्रमाण 69 टक्‍क्‍यांपर्यंत पोचले आहे.