डिजिटल इंडिया साकारण्यास निरक्षरता संपविणे गरजेचे

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 22 डिसेंबर 2016

औरंगाबाद - देशातील २५ टक्के निरक्षरतेचे प्रमाण, आधुनिक तंत्रज्ञान साधनांची उपलब्धता, भाषिक विविधता यासह असंख्य प्रश्‍नांवर मात केली तरच ‘डिजिटल इंडिया’चे स्वप्न प्रत्यक्षात उतरू शकेल, असे प्रतिपादन व्यवस्थापन, संगणकतज्ञ डॉ. ए. के. नायक यांनी केले.  

औरंगाबाद - देशातील २५ टक्के निरक्षरतेचे प्रमाण, आधुनिक तंत्रज्ञान साधनांची उपलब्धता, भाषिक विविधता यासह असंख्य प्रश्‍नांवर मात केली तरच ‘डिजिटल इंडिया’चे स्वप्न प्रत्यक्षात उतरू शकेल, असे प्रतिपादन व्यवस्थापन, संगणकतज्ञ डॉ. ए. के. नायक यांनी केले.  

डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठातील संगणकशास्त्र व माहिती तंत्रज्ञान विभागाच्या रौप्यमहोत्सवी वर्षानिमित्त कॉन्फरन्स ऑन कॉग्निटिव्ह नॉलेज इंजिनिअरिंग’ या विषयावर दुसरी आंतरराष्ट्रीय परिषद बुधवारी (ता.२१) सुरू झाली. परिषदेच्या अध्यक्षस्थानी कुलगुरू डॉ. बी. ए. चोपडे होते. केंद्रीय विज्ञान तंत्रज्ञान विभागाचे शास्त्रज्ञ डॉ. देवप्रिया दत्ता, डॉ. पंकज कोईनकर, जपानमधील टोकुसीमा विद्यापीठाचे डॉ. स्टीफन कारुंगरू आदींची प्रमुख उपस्थिती होती.

प्रा. ए. के. नायक म्हणाले, भारताची लोकसंख्या १३० कोटींच्या पुढे पोहोचली आहे. त्याबाबतचे वास्तव स्वीकारून आपण नियोजन केले तरच ‘डिजिटली एम्पॉवर’ होऊ शकतो. डॉ. देवप्रिय दत्ता म्हणाले, ‘को-कॉग्निटिव्ह नॉलेज इंजिनिअरिंगला अत्यंत महत्त्व असून केंद्र त्यासाठी निधी व तंत्रज्ञान उपलब्ध करून देत आहे. या वेळी डॉ. पंकज कोईनूर व डॉ. स्टीफन कारुंगरू यांचीही भाषणे झाली. कुलगुरू डॉ. बी. एच. चोपडे यांनी सांगितले की, या ज्ञानाचा  वापर देशाच्या व समाजाच्या भल्यासाठी केला तरच खऱ्या आर्थाने आपण ज्ञाने महासत्ता होऊ. 

परिषदेस ४०० संशोधक असून दोनशे शोध निबंध सादर होणार असल्याची माहिती संयोजक डॉ. रत्नदीप देशमुख यांनी दिली. डॉ. सी. नम्रता व भक्‍ती अहिरवाड यांनी सूत्रसंचालन केले. डॉ. एस. एन. देशमुख यांनी आभार मानले. परिषदेसाठी डॉ. भारती गवळी, डॉ. रमेश मंझा, डॉ. प्रवीण यन्नावार, डॉ. सोनाली कुलकर्णी, डॉ. सुनील निंभोरे, डॉ. उल्हाश शिंदे, डॉ. एस. एन. हेळबे, डॉ. प्राप्ती देशमुख, डॉ. अशोक गायकवाड, डॉ. एस. एन. काकरवाल, डॉ. गणेश साबळे यांनी पुढाकार घेतला.