हिप्परगा येथे 230 जणांना गॅस्ट्रोची लागण

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 17 मे 2017

मुखेड तालुक्‍यातील जांब गावापासून चार किलोमीटर अंतरावरील हिप्परगा (दे.) येथे एक मे पासून गॅस्ट्रोची साथ पसरली असून तीन दिवसात गावातील 230 रुग्णांवर उपचार करण्यात आले आहेत. आरोग्य विभागाच्या तत्परतेमुळे गॅस्ट्रोची साथ आटोक्‍यात आली असून आरोग्य विभागाचे पथक तीन दिवसापासून तळ टोकून बसले आहे.

नांदेड - मुखेड तालुक्‍यातील जांब गावापासून चार किलोमीटर अंतरावरील हिप्परगा (दे.) येथे एक मे पासून गॅस्ट्रोची साथ पसरली असून तीन दिवसात गावातील 230 रुग्णांवर उपचार करण्यात आले आहेत. आरोग्य विभागाच्या तत्परतेमुळे गॅस्ट्रोची साथ आटोक्‍यात आली असून आरोग्य विभागाचे पथक तीन दिवसापासून तळ टोकून बसले आहे.

हिप्परगा येथील सात ते आठ रुग्ण आपल्या पोटात दुखणे, मळमळ, जुलाब होत असल्यामुळे जांब येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात उपचारासाठी गेले असता. तेथील वैद्यकीय अधिकारी डॉ.माया कापसे यांनी ही गॅस्ट्रोचीच साथ असल्याचे ओळखले. त्यांनी तात्काळ मुखेडचे तालुका आरोग्य अधिकारी डॉ.रमेश गवाळे यांना कळविले. त्यांनी तत्काळ दोन वैद्यकीय अधिकारी व परिचारीका यांच्यासह सर्व आरोग्य पथकच गावात दाखल झाले. प्रत्येक घरी भेट देऊन सर्वेक्षण केले. त्यांची पहाणी करुन त्यांच्या घरातील पाणर, अनुजैविक व रासायनिक जलस्त्रोतत्वे शुध्दीकरणासाठी ब्लिचिंग पावडर व मेडीक्‍लोर औषण टाकून पाणी शध्दीकरण करण्यात आले.

सोमवारी हिप्परगा येथे 10 रुग्णांची तपासणी करण्यात आली. तसेच तीन दिवसापासून आरोग्य पथकाने तपासणी व औषधी उपचार करीत गावातच मुक्काम केला आहे. 1 गंभीर रुग्णांना जवळच असलेल्या जळकोट (जि.लातूर) येथील ग्रामीण रुग्णालयात संदर्भित करण्यात आले. या रुग्णांबाबत जळकोट येथील वैद्यकीय अधिक्षक डॉ.देवणीकर यांनी सर्व रुग्णांची प्रकृती स्थीर असल्याचे सांगितले. दुसऱ्या दिवशी मंगळवारी (ता.16) 92 रुग्णांची तपासणी व उपचार करण्यात आले. दोन दिवसात 197 रुग्णांवर उपचार करण्यात आले. त्यामुळे परिस्थिती आटोक्‍यात आली आहे. यासाठी आरोग्य विभागाचे डॉ.माया कापसे, डॉ.श्रिनिवास हसनाळे, डॉ.डि.एस.गायकवाड, डॉ.दिपाली गोरे, डॉ.एच.एस.मेदेवाड, आरोग्य विस्तार अधिकारी सचिन पांढरमिसे, ग्रामसेवक ए.बी.केंद्रे, आरोग्य सहाय्यक सी.एस.जाधव, एम.टी.गवळे, आरोग्य सेवक एम,व्ही.सावंत, बी.व्ही.ढगे, विजय फुले, ज्योती कोटीवाले यांनी परिश्रम घेतले.

पाणी नमुने नांदेडला पाठवले
वैद्यकीय पथक गावात असून साथ आटोक्‍यात आली असली तरी साथीचे कारण समजन्यासाठी आम्ही पाणी नमुने नांदेड येथे पाठवले आहेत. त्याचा अहवाल आल्यानंतर याचे कारण कळेल. तरी गावातील आरोग्य पथक 24 तास काम करीत आहे. कुठल्याही औषधाचा तुटवडा कमी पडणार नाही
- डॉ.रमेश गवाळे, तालुका वैद्यकीय अधिकारी,मुखेड

Web Title: Infection of Gastro for 230 villagers