आयपीएलवर सट्टा लावणारा अटकेत

उमेश वाघमारे
गुरुवार, 26 एप्रिल 2018

प्रशांत म्हस्के याला आयपीएलवर सट्टा लावताना पोलिसांनी अटक केली आहे. त्याच्याकडून दोन मोबाईल व रोख रक्कम असा 21 हजार 400 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. 

जालना - आयपीएल बुकीचलकांसह आता सट्टा लावणाऱ्यांवरही जालना पोलिसांनी गुन्हे दाखल करण्यात सुरवात केली आहे. शहरातील इन्कमटॅक्स काॅलनी येथे बुधवारी (ता. 25) रात्री उशिरा छापा टाकून प्रशांत म्हस्के याला आयपीएलवर सट्टा लावताना पोलिसांनी अटक केली आहे. त्याच्याकडून दोन मोबाईल व रोख रक्कम असा 21 हजार 400 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. 

या प्रकरणी कदीम जालना पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दरम्यान संशयित प्रशांत म्हस्के हा मोबाईलवरून काही बुकिचालकांकडे आयपीएलवर सट्टा लावत होता. म्हस्के यांच्या मोबाईल रेकाॅर्डवरून या प्रकरणी जिल्ह्याबाहेर असलेल्या तीन बुकिचालकांची नावे समोर  आल्याचं पोलिस सूत्रांनी सांगितले आहे. ही कारवाई उपविभागीय पोलिस अधीकारी डाॅ. सचिन बारी, स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक राजेंद्रसिंह गौर यांच्यासह पोलिस कर्मचारी यांनी केली आहे.

रविवारपासून चौथी कारवाई 
आयपीएल सट्टा बुकीचालकांसह सट्ट लावणाऱ्यांवर मागील रविवारपासून (ता. 22) पोलिसांनी ही चौथी कारवाई केली आहे. यात जालना शहरात तीन तर मंठा येथे एक कारवाई करण्यात आली आहे. 

Web Title: IPL betting scandal