पत्नीला आणायला गेलेल्या जावयाचा खून; जालन्यातील घटना

लक्ष्मीकांत कुलकर्णी
रविवार, 24 सप्टेंबर 2017

पत्नीसह सासू, सासरा, मेव्हणा व मेहुणी फरारी

कुंभार पिंपळगाव (जि. जालना) : माहेरी गेलेल्या पत्नीला आणायला गेलेल्या तरुणावर सासरवाडीत खुनी हल्ला करण्यात आला. यात गंभीर जखमी झालेल्या जावई खंडू सर्जेराव लोंढे (वय ३६) यांचा दवाखान्यात नेताना रस्त्यात मृत्यू झाला.

अरगडे गव्हाण (ता. घनसावंगी) येथे रविवारी (ता २४) ही घटना घडली. लोंढे यांच्या सासरवाडीतील लोकांवर गुन्हा दाखल करण्यासाठी नातेवाईकांची पोलिस चौकीत गर्दी केली होती. 
दरम्यान, पत्नीसह सासू, सासरा, मेहुणा व मेहुणी फरार झाले आहेत.

Web Title: jalna news husband murdered by in laws

टॅग्स