जालना: भारिपच्या कार्यकर्त्यांनी बबनराव लोणीकर यांना दाखविले काळ झेंडे

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 9 जुलै 2017

आष्टी (जि. जालना) - मध्यप्रदेशमधील महू येथे भारतीय जनता पक्षाच्या कार्यकर्त्यांनी ऍड. प्रकाश आंबेडकर यांना काळे झेंडे दाखविले होते. या प्रकाराचा निषेध म्हणून राज्याचे स्वच्छता व पाणीपुरवठा मंत्री बबनराव लोणीकर यांच्या गाडीचा ताफा अडवून आज (रविवार) काळे झेंडे दाखविण्यात आले.

जालना जिल्ह्यातील आष्टी येथून लोणीकर त्यांच्या ताफ्यावर जात असताना भारतीय रिपब्लिकन पक्षाच्या कार्यकर्त्यांनी त्यांचे वाहन अडविले. त्यांना काळे झेंडे दाखवत जोरदार घोषणाबाजी करत कार्यकर्त्यांनी मध्यप्रदेशमधील घटनेचा निषेध करण्यात आला.