जालना जिल्ह्यातील नऊ हजार विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती

सुहास सदाव्रते
गुरुवार, 24 मे 2018

जालना - जिल्ह्यातील कनिष्ठ व वरिष्ठ महाविद्यालयांतील विविध अभ्यासक्रमांच्या एससी, ओबीसी, व्हीजेएनटीसह इतर जातप्रवर्गांतील नऊ हजार विद्यार्थ्यांना भारत सरकार शिष्यवृत्ती ऑनलाइन देण्यात आली आहे.

जालना - जिल्ह्यातील कनिष्ठ व वरिष्ठ महाविद्यालयांतील विविध अभ्यासक्रमांच्या एससी, ओबीसी, व्हीजेएनटीसह इतर जातप्रवर्गांतील नऊ हजार विद्यार्थ्यांना भारत सरकार शिष्यवृत्ती ऑनलाइन देण्यात आली आहे.

विशेष समाजकल्याण सहायक आयुक्‍त कार्यालयाच्या वतीने भारत सरकार शिष्यवृत्तीचे कामकाज करण्यात येते. मागील शैक्षणिक वर्षात जिल्ह्यातील कनिष्ठ आणि वरिष्ठ महाविद्यालयांतील विविध अभ्यासक्रमांची २३४ महाविद्यालये आहेत. या महाविद्यालयांत प्रविष्ठ असलेल्या एससी, ओबीसी, व्हीजेएनटी, एसबीसी आदी जातप्रवर्गांतील १२ हजारपेक्षा अधिक विद्यार्थ्यांनी ऑनलाइन शिष्यवृत्तीचे अर्ज भरले होते. ऑनलाइन शिष्यवृत्तीचे अर्ज संबंधित विद्यार्थ्यांनी आपल्या प्रवेशित महाविद्यालयाच्या लॉगिंगवर भरण्यात आले होते. ऑनलाइन प्रक्रियेनुसार संबंधित महाविद्यालयाच्या प्राचार्यांनी यास ऑनलाइन मंजुरी देत सदर अर्ज हे विशेष समाजकल्याण सहायक आयुक्‍त यांच्या लॉगिंगवर पाठविण्यात आले होते. ऑनलाइन अर्जाची प्रकिया ही शैक्षणिक वर्षाच्या शेवटी पूर्ण करण्यात आलेली होती. यानुसार जिल्ह्यातील कृषी,अभियांत्रिकी, डीएड-बीएड, कला, वाणिज्य, विज्ञान, विधी यासह विविध अभ्यासक्रमांच्या महाविद्यालयांतील १२ हजार विद्यार्थ्यांनी अर्ज भरले होते. यापैकी नऊ हजार विद्यार्थ्यांना भारत सरकार शिष्यवृत्ती ऑनलाइन खात्यावर जमा करण्यात आली असल्याचे विशेष समाजकल्याण विभागाकडून सांगण्यात आले आहे. शासनाने यंदापासून भारत सरकार शिष्यवृत्तीच्या कामकाजात बदल केला आहे. यापूर्वी भारत सरकार शिष्यवृत्तीच्या कामकाजात परीक्षा शुल्क आणि शिक्षण शुल्क हे थेट महाविद्यालयांच्या खात्यावर जमा होत नव्हते. नवीन शासन निर्णयानुसार शैक्षणिक वर्षापासून रक्कम विद्यार्थ्यांच्या खात्यावर ऑनलाइन जमा केली जाईल. त्याचबरोबर संबंधित महाविद्यालयाची रक्‍कम ही महाविद्यालयाच्या खात्यावर जमा केली जाईल, असा बदल करण्यात आला आहे.

शैक्षणिक वर्षात जिल्ह्यातील विविध महाविद्यालयांनी ऑनलाइन प्रस्ताव ज्याप्रमाणे सादर केले त्याप्रमाणे शिष्यवृत्ती देण्यात आलेली आहे. काही विद्यार्थ्यांनी भरलेली माहिती आणि ऑनलाइन माहिती यात अनेक त्रुटी असल्याने सदर प्रस्तावही तातडीने मार्गी लावण्यात येतील.
- बलभीम शिंदे,  सहायक आयुक्‍त, विशेष समाजकल्याण, जालना.

Web Title: jalna news Scholarship for nine thousand students of Jalna district