काश्‍मिरींची पाकबद्दल सहानुभूती वाढेल - देसाई 

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 7 जानेवारी 2017

औरंगाबाद - काश्‍मिरी लोकांसोबत केंद्र सरकारचा संवाद सात महिन्यांपासून थांबलेला आहे. अशीच परिस्थिती कायम राहिल्यास लोक धर्माकडे वळतील. त्यातून लोकांमध्ये पाकिस्तानबद्दल सहानुभूती वाढेल, असे प्रतिपादन ज्येष्ठ पत्रकार जतीन देसाई यांनी व्यक्‍त केली. 

दर्पण दिनानिमित्त शुक्रवारी मराठवाड्यातील ज्येष्ठ पत्रकारांचा एमजीएमतर्फे गौरव करण्यात आला. त्या वेळी "भारत - पाक संबंध आणि पत्रकारांची संवेदनशीलता' या विषयावर बोलताना देसाई म्हणाले, ""काश्‍मीरमधील बदल सरकारने लक्षात घेतले पाहिजेत. काश्‍मीरमध्ये प्रश्‍न उद्‌भवल्यास अटलबिहारी वाजपेयी थेट तेथील जनतेशी बोलत होते. त्यांच्याप्रमाणेच या सरकारनेही भूमिका घ्यावी. काश्‍मीरमधील परिस्थिती चिघळण्यामुळे एखाद्या पक्षाला काही काळासाठी फायदा होऊ शकतो. दीर्घ काळामध्ये मात्र, देशाला धोका उत्पन्न होऊ शकतो. केंद्र सरकारने बोलणीसाठी वातावरण तयार केले पाहिजे.''