संत साहित्य संमेलनाचे आज उद्‌घाटन

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 29 मे 2017

लातूर - महाराष्ट्र वारकरी साहित्य परिषदेच्या वतीने येथे 29 ते 31 मे या कालावधीत सहावे अखिल भारतीय मराठी संत साहित्य संमेलन होत आहे.

लातूर - महाराष्ट्र वारकरी साहित्य परिषदेच्या वतीने येथे 29 ते 31 मे या कालावधीत सहावे अखिल भारतीय मराठी संत साहित्य संमेलन होत आहे.

सोमवारी (ता. 29) सकाळी 9.30 वाजता अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या हस्ते या संमेलनाचे उद्‌घाटन होईल. पुढील तीन दिवस या संमेलनाच्या निमित्ताने शेतकरी आत्महत्या, पाणी नियोजन, स्त्री भ्रूणहत्या, वृक्षलागवड अशा विविध विषयांवर चर्चा केली जाणार आहे.

उद्‌घाटन कार्यक्रमाला गृहराज्यमंत्री दीपक केसरकर, खासदार डॉ. सुनील गायकवाड, माजी मंत्री जयदत्त क्षीरसागर, महापौर सुरेश पवार आदीं उपस्थित राहणार आहेत. वारकरी संत साहित्य परिषदेच्या संत साहित्याचा प्रचार व प्रसार करण्याच्या उद्देशाने हे संमेलन होत आहे. यानिमित्ताने सोमवारी सकाळी दिंडी काढली जाणार आहे. या दिंडी सोहळ्याचा प्रारंभ आमदार दिलीपराव देशमुख, आमदार राणा जगजितसिंह पाटील यांच्या हस्ते होणार आहे.