बनावट एक्‍स्चेंज प्रकरण दोघांच्या कोठडीत वाढ 

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 28 जून 2017

लातूर - पोलिसांनी लातूर शहरात उघड केलेल्या बनावट टेलिफोन एक्‍स्चेंज प्रकरणातील दोन आरोपींच्या पोलिस कोठडीत न्यायालयाने गुरुवारपर्यंत वाढ केली. 

लातूर - पोलिसांनी लातूर शहरात उघड केलेल्या बनावट टेलिफोन एक्‍स्चेंज प्रकरणातील दोन आरोपींच्या पोलिस कोठडीत न्यायालयाने गुरुवारपर्यंत वाढ केली. 

पोलिसांनी काही दिवसांपूर्वी टाकलेल्या छाप्यात लातूर शहरात चार बनावट टेलिफोन एक्‍स्चेंज उघड केले आहेत. या प्रकरणात आतापर्यंत सात आरोपींना अटक केली असून, या सर्व आरोपींची सखोल चौकशी करण्यात येत आहे. त्यांच्या बॅंक खात्यापासून संपर्काचीही चौकशी करण्यात येत आहे. या प्रकरणाची धागेदोरे शोधण्याचा पोलिस कसून प्रयत्न करत आहेत. प्रकरणात अटक केलेल्या शंकर बिरादार व महेश मळभागे या दोन आरोपींच्या पोलिस कोठडीची मुदत संपल्याने दोघांना पोलिसांनी मंगळवारी (ता. 27) येथील न्यायालयासमोर हजर केले. प्रकरणातील आणखी तपासासाठी पोलिसांनी या दोघांच्या पोलिस कोठडीत वाढ करण्याची मागणी न्यायालयाकडे केली. ती मंजूर करून न्यायालयाने या दोघांच्या पोलिस गुरुवारपर्यंत कोठडीत वाढ केली आहे.