लातुरात लिंगायत धर्माचा ध्वज फडकला; महामोर्चासाठी लाखोंचा सहभाग

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 3 सप्टेंबर 2017

या मोर्चाचे नेतृत्व १०२ वर्ष असलेले डॉ. शिवलिंग शिवाचार्य महाराज हे करणार आहेत. तसेच या महामोर्चात सहभागी होण्यासाठी प्रथम महिला जगदगुरु  माता महादेवी, जगदगुरु बसव मृत्युंजय स्वामी, डॉ. बसवलिंग पट्टदेवरु, जगदगुरु यन्न बसवन्न महास्वामी, कोरनेश्वर स्वामी उस्तुरी हे सर्व गुरु शहरात दाखल झाले आहेत.

लातूर : अखिल भारतीय लिंगायत समन्वय समितीच्या वतीने लिंगायत धर्माच्या संवैधानिक मान्यतेसाठी व लिंगायतांना राष्ट्रीय स्तरावर अल्पसंख्यांक दर्जा देण्यात यावा, या व अन्य मागण्यासाठी रविवारी (ता. ३) महामोर्चाचे आयोजन करण्यात आले होते.

या करीता महाराष्ट्रासह कर्नाटक, तामिळनाडू, मध्यप्रदेश, आंध्रप्रदेश, तेलंगाना आदी राज्यातून बांधव येथे दाखल झाले आहेत. सकाळपासून जत्थेच्या जत्थे येथील जिल्हा क्रीडा संकुलात दाखल होत आहेत. धर्म मान्यतेअभावी समाज बांधवांना धार्मिक अल्पसंख्यांकांच्या कोणत्याही सवलती, हक्क मिळत नाहीत.  त्यामुळे हा समाज मागे आहे. धर्मामान्यतेसाठी या महामोर्चाचे आयोजन करण्यात आले आहे.

या मोर्चाचे नेतृत्व १०२ वर्ष असलेले डॉ. शिवलिंग शिवाचार्य महाराज हे करणार आहेत. तसेच या महामोर्चात सहभागी होण्यासाठी प्रथम महिला जगदगुरु  माता महादेवी, जगदगुरु बसव मृत्युंजय स्वामी, डॉ. बसवलिंग पट्टदेवरु, जगदगुरु यन्न बसवन्न महास्वामी, कोरनेश्वर स्वामी उस्तुरी हे सर्व गुरु शहरात दाखल झाले आहेत.

लातूर जिल्ह्यातील ग्रामीण भागातून समाज बांधव मोठ्या संख्येने येथे आले आहेत. तसेच महाराष्ट्रसह कर्नाटक, आंध्रप्रदेश, केरळ, तामिळनाडू, मध्यप्रदेश आदी राज्यातील समाज बांधवही मोठ्या संख्येने येथे आले आहेत. हा महामोर्चा शांततेत पार पडवा या करीता समितच्या वतीने दोन हजार स्वयंसेवक कार्यरत आहेत. बाहेरहून येणाऱय़ समाज बांधवांची संख्या मोठी असणार आहे. त्यामुळे बाहेरून येणाऱया वाहनासाठी शहरातील विविध भागात दहा ठिकाणी पार्किंग व्यवस्था करण्यात आली होती. तसेच सात ठिकाणी अल्पोपहाराची सोय करण्यात आली आहे. अनेक कार्यकर्ते भगवे ध्वज, टोप्या, गमजे घालून या महामोर्चात सहभागी होत आहेत. `लिंगायत धर्म स्वतंत्र
धर्म`, `जगदज्योती बसवेश्वर महाराज की जय`, `आम्ही लिंगायत, आमचा धर्म
लिंगायत`, `वब्ब लिंगायत, कोटी लिंगायत` अशा घोषणांनी क्रीडा संकुलाचा
परिसर दणाणून गेला होता.