निलंगेकरांनी घराणेशाहीला थोपवून जिंकला पहिला डाव

- विकास गाढवे
रविवार, 29 जानेवारी 2017

जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीत एक पदाच्या गुगलीने घालमेल

लातूर - नगरपालिका निवडणुकीत जिल्ह्यात भारतीय जनता पक्षाने भरीव यश मिळविले. यशाची ही घौडदौड जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीतही कायम ठेवण्यासाठी पालकमंत्री संभाजी पाटील निलंगेकर यांनी आपल्या ‘कौशल्य विकासा’तून चांगलीच मोर्चेबांधणी हाती घेतली आहे. बंधू अरविंद पाटील यांना उमेदवारी नाकारत जिल्ह्यातील राजकारणात वर्षानुवर्षाची घराणेशाही त्यांनी थोपविली. यातून त्यांनी जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीत पहिला डाव जिंकल्याची चर्चा जिल्ह्याच्या राजकारणात सुरू झाली आहे. 

घराणेशाही थोपविताना त्यांनी टाकलेली ‘एक कुटुंब, एक पद’ ही गुगली भाजपसोबत इतर पक्षांतील इच्छुकांची घालमेल वाढविणारी ठरली आहे. जिल्हा परिषदेचे अध्यक्षपद खुल्या प्रवर्गासाठी सुटल्यापासूनच जिल्ह्यात अध्यक्षपदाचे दावेदार वाढले. यात जिल्ह्यातील राजकारणाच्या परंपरेनुसार जिल्ह्यात प्रभावी असलेल्या निलंगेकर व देशमुख कुटुंबांतील व्यक्तींचीच नावे पुढे आली. देशमुख कुटुंबातून धीरज, तर निलंगेकर कुटुंबातून पालकमंत्री निलंगेकर यांचे बंधू अरविंद यांचे नाव पुढे आले. निलंगा नगरपालिका निवडणुकीत अरविंद पाटील यांनी दाखविलेल्या कुशलतेमुळे भाजपची एकहाती सत्ता आली. यातूनच जिल्हा परिषदेचे अध्यक्ष धीरज होणार की अरविंद होणार, यावर चर्चा सुरू झाली. या चर्चेआधीच धीरज देशमुख यांनी एकुरगा (ता. लातूर) गटातून तयारी सुरू केली. अरविंद पाटील कोणत्या गटातून तयारी सुरू करणार, याची उत्सुकता असतानाच पालकमंत्री निलंगेकर यांनी सर्वांनाच आश्‍चर्याचा धक्का दिला. ‘मी पदावर असेपर्यंत अरविंद पाटील कोणतीच निवडणूक लढविणार नाहीत’ किंवा पदावर राहणार नसल्याचे स्पष्ट करून त्यांनी जिल्हा परिषदेच्या अध्यक्षपदी सामान्य कार्यकर्त्याला संधी देणार असल्याचे जाहीर केले.

निलंगेकरांच्या या भूमिकेमुळे सर्वांच्याच भुवया उंचावल्या. अरविंद पाटील यांना उमेदवारी नाकारून त्यांनी जिल्ह्याच्या राजकारणात वर्षानुवर्षे सुरू असलेल्या घराणेशाहीला थोपविले व राजकारणात ‘एक कुटुंब, एक पद’ हा नवा पॅटर्न सुरू केला. हा पॅटर्न जिल्ह्याच्या राजकीय परंपरेला धक्का देणारा ठरला. या पॅटर्नची जिल्ह्यात जोरदार चर्चा व कौतुक झाले. निवडणुकीत उमेदवारीसाठी राजकीय घराण्यातील इच्छुकांची घालमेल वाढली आहे. तर सामान्य कार्यकर्त्यांच्या आशा पल्लवित झाल्या आहेत.

स्वतःत बदल अन्‌ पक्षातही बदल
पालकमंत्रिपद मिळाल्यापासून श्री. निलंगेकर यांनी स्वतःत खूप बदल केले आहेत. या बदलातून त्यांनी पहिल्यांदा जिल्ह्यात पक्षामध्ये असलेले गट एकत्र आणले. सर्वांचे मनोमिलन करण्यासाठी पुढाकार घेतला. त्यामुळे नगपालिका निवडणुकीत याचा चांगला परिणाम दिसून आला. पक्षातील एकीचे बळ वाढविताना निलंगेकर यांनी सर्वांना सोबत घेऊन जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीची मोर्चेबांधणी सुरू केली आहे. जराही उसंत न घेता ते पदाधिकारी व कार्यकर्त्यांसोबत संवाद वाढवीत आहेत. पदाचा गर्व व अभिमान कुठेही आडवा येऊ न देता त्यांनी काम सुरू केल्याने त्यांच्या निवासस्थानी मागील काही महिन्यांत गर्दी वाढली आहे. यामुळे पूर्वी येणाऱ्या ‘त्याच त्या’ पदाधिकारी व कार्यकर्त्यांच्या गर्दीत आता नवे चेहरे दिसत आहेत. यातच भाजपमध्ये प्रवेश करणाऱ्यांची संख्याही दिवसेंदिवस वाढत आहे.

Web Title: latur zilla parishad & panchyat committe election