कोंबड्यांच्या खुराड्यात बिबट्या अडकला

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 23 मे 2017

राजूर - भक्ष्याचा शोध घेत कोंबड्यांच्या खुराड्यात शिरलेला बिबट्या बाहेर पडण्याचा मार्ग न सापडल्याने अर्धा तास अडकून पडला. अखेर रहिवाशांनी त्याला कसेबसे हुसकावून लावले. टाकळी येथे मंगळवारी सकाळी हा प्रकार घडला.

बाळासाहेब रामकृष्ण तिकांडे यांच्या वस्तीवरील कोंबड्यांच्या खुराड्यात सकाळी आठच्या सुमारास बिबट्या शिरला. बाहेर पडण्याची वाट न सापडल्याने अडकून पडला. बिबट्या दिसल्यावर तिकांडे यांनी आजूबाजूच्या लोकांना सावध केले. त्यांनी कसेबसे त्याला हुसकावून लावले. टाकळी, गर्दनी, ढोकरी परिसरात सध्या बिबट्याची दहशत आहे. ग्रामस्थ सहानंतर शेतात थांबत नाहीत. उन्हाळा असल्याने वीज शक्‍यतो रात्रीच असते. वीज आल्यावर पिकांना पाणी द्यायला शेतात जायचे, की बिबट्यापासून आपला जीव वाचवायचा, असा प्रश्‍न शेतकऱ्यांना सतावत आहे.