नांदेड: महावितरणचे एसएमएस आता मराठीत...

प्रल्हाद कांबळे
बुधवार, 24 मे 2017

वीजग्राहकांचे वीजबील तयार होताच ग्राहकाने किती वीज वापरली आहे, मीटर रीडिंग, एकूण वीजबील किमी आहे.सध्याचे चालू रिडींग अशा प्रकारची माहिती वीजग्राहकांना देण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे. त्याचबरोबर वीज पुरवठा खंडीत झाल्यास अथवा ब्रेकडाऊन झाल्यास संबंधीत ग्राहकांचा वीज पुरवठा केंव्हा सुरू होणार आहे याची माहिती देखील मराठी एसएमएसच्या माध्यमातून तातडीने मिळणार आहे

नांदेड - महावितरणच्या प्रणालीमध्ये मोबाईल क्रमांक नोंदविलेल्या वीजग्राहकांना आता मराठी भाषेत सेवा देणे शक्य झाले आहे. वीजबिलांसह इतर वीज सेवे संबंधीची माहिती एसएमएसव्दारे आता मराठीतही उपलब्ध करून देण्यात आली आहे.

महावितरणच्या वतीने सध्या  मोबाईल क्रमांक नोंदवलेल्या ग्राहकांना वीजबिला संबंधीची माहिती पुर्वी एसएमएस व्दारे केवळ इंग्रजी भाषेतच दिली जायची. मात्र आता ग्रामीण भागातील वीजग्राहकांच्या भाषेची अडचण लक्षात घेवून मराठी भाषेतही एसएमएस सेवा उपलब्ध करून देण्यात आली आहे.

वीजग्राहकांचे वीजबील तयार होताच ग्राहकाने किती वीज वापरली आहे, मीटर रीडिंग, एकूण वीजबील किमी आहे.सध्याचे चालू रिडींग अशा प्रकारची माहिती वीजग्राहकांना देण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे. त्याचबरोबर वीज पुरवठा खंडीत झाल्यास अथवा ब्रेकडाऊन झाल्यास संबंधीत ग्राहकांचा वीज पुरवठा केंव्हा सुरू होणार आहे याची माहिती देखील मराठी एसएमएसच्या माध्यमातून तातडीने मिळणार आहे. यासाठी वीजग्राहकांनी मोबाईल क्रमांक महावितरणकडे नोंदविला असेल तर नोंदविलेल्या मोबाईल क्रमांकावरून मराठी भाषेसाठी कॅपीटल मध्ये एमएलऐएनजी टाईप करून स्पेस देवून आपला बारा आकडी ग्राहक क्रमांक टाकावा त्यानंतर स्पेस देवून एक क्रमांक टाकून 9225592255 या क्रमांकावरती पाठवून द्यावा. 

ग्राहकाभिमुख सेवा प्रदान करण्यासाठी महावितरण सातत्याने प्रयत्न करते आहे. अद्यावत तंत्रज्ञानाचा अवलंब करत ग्राहकहिताचे अनेक उपक्रम महावितरण राबवत आहे. या सर्व सेवा सुविधा प्राप्त होण्यासाठी वीजग्राहकांनीही एक पाऊल पुढे येत आपला मोबाईल क्रमांक महावतिरणच्या प्रणाली मध्ये नोंद करणे अत्यावश्यक आहे. त्यामुळे नांदेड परिमंडळातील वीज ग्राहकांनी मोबाईल क्रमांक नोंदवावा तसेच मोबाईल वापर वाढवावा असे आवाहन नांदेड परिमंडळाच्या वतीने मुख्य अभियंता अविनाश पाटोळे यांनी केले आहे