मराठा समाजाच्या मागण्या योग्यच - रामदास कदम

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 29 सप्टेंबर 2016

औरंगाबाद - मराठा समाजावर अन्याय होत आहे, याविषयी कोणतेही दुमत नाही. मराठा समाजाच्या मागण्या योग्यच आहेत. मी या मागण्यांचे समर्थन करतो, असे प्रतिपादन पर्यावरणमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री रामदास कदम यांनी बुधवारी केले. 

मराठा समाजाचे राज्यभर लाखोंच्या संख्येने शिस्तबद्ध मोर्चे निघत आहेत. या मोर्चाच्या माध्यमातून कोपर्डी घटनेतील पीडितेच्या कुटुंबीयांना न्याय देण्याची, आरक्षणाची व "ऍट्रॉसिटी‘संदर्भात मागण्या केल्या जात आहेत. कदम आज शहरात आले होते. महापौरांच्या निवासस्थानी पत्रकारांशी त्यांनी संवाद साधला. शिवसेनेचे मुखपत्र असलेल्या "सामना‘त प्रसिद्ध झालेल्या मूकमोर्चाच्या संदर्भातील व्यंग्यचित्राविषयी विचारले असता त्यांनी सांगितले, की या संदर्भात मी योग्य वेळी बोलणार आहे. मीसुद्धा मराठा आहे, मराठा समाजावर अन्याय होत आहे यात कोणतीही शंका नाही. मराठा क्रांती मोर्चाच्या माध्यमातून करण्यात येत असलेल्या मागण्या योग्यच आहेत. मी मराठा म्हणून या मागण्यांचे पूर्णपणे समर्थन करतो. ऍट्रॉसिटी कायद्याविषयी ते म्हणाले, की हा कायदा रद्द करावा या मताचा मी नाही, तर या कायद्यात बदल करण्यात यावा, असे मला वाटते.