मराठा क्रांती मोर्चाला आक्रमक स्वरूप

माजलगाव - येथील परभणी फाट्यावर शुक्रवारी करण्यात आलेला रास्ता रोको.
माजलगाव - येथील परभणी फाट्यावर शुक्रवारी करण्यात आलेला रास्ता रोको.

बीड - मराठा समाजाच्या आरक्षणाचा निर्णय जाहीर करूनच मेगा भरती करावी, यासह विविध मागण्यांसाठी जिल्ह्यात सुरू असलेल्या मराठा क्रांती ठोक मोर्चाला आता आक्रमक स्वरूप प्राप्त होऊ लागले आहे. दोन दिवसांत रास्ता रोको, मोर्चा तसेच बसवर दगडफेकीच्या घटनाही घडल्या.

मराठा आंदोलनाची तीव्रता जिल्ह्यात अधिकाधिक वाढत आहे. परळीत शुक्रवारी तिसऱ्या दिवशीही उपजिल्हाधिकारी, तहसील कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन सुरूच राहिले. आता आंदोलनकर्त्यांना जेवण तयार करण्यासाठी पत्र्याचे शेड उभे केले जात आहे. आंदोलनात दिवसेंदिवस गर्दी वाढत असून, आता महिलाही सहभागी होत आहेत.

आंदोलनाच्या पार्श्‍वभूमीवर शुक्रवारी सकाळी माजलगावजवळील परभणी फाटा येथे रास्ता रोको करण्यात आला. काही युवकांनी खासगी वाहनांच्या काचा फोडल्या; तसेच पोलिसांवरही दगडफेक केली.

मोर्चेकऱ्यांनी तहसील कार्यालय परिसरात काही काळ ठिय्या धरूर मुंडण केले. केज शहरात व्यापारपेठ बंद ठेवून मोर्चा काढण्यात आला. कुंबेफळ (ता. केज), धारूर येथे रास्ता रोको; तसेच पाटोदा व गेवराई येथे ठिय्या आंदोलन झाले. अंबाजोगाई तालुक्‍यातील बर्दापूरजवळ रस्त्यावर टायर जाळण्यात आले. गुरुवार, शुक्रवार या दोन दिवसांत पाच ठिकाणी बस फोडण्यात आल्या.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com