दीडशे टन कचरा अज्ञातस्थळी!

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 14 मार्च 2018

औरंगाबाद - शहरात 26 दिवसांपासून पडून असलेल्या हजारो टन कचऱ्यामुळे नागरिकांचे आरोग्य धोक्‍यात आलेले असताना, केवळ दीडशे टन कचऱ्याची विल्हेवाट लावण्यात महापालिका प्रशासनाला यश आले. सोमवारी (ता. 12) रात्री शंभर टन; तर मंगळवारी सकाळी (ता. 13) पन्नास टन कचरा भरून अज्ञातस्थळी पाठविण्यात आला. नऊ वॉर्डांत कचऱ्यावर प्रक्रिया करण्यासाठी नागरिकांचा विरोध कायम असून, लवकरच जागा अंतिम होईल, असे पालिकेने सांगितले. औरंगाबाद शहरात अद्याप सुमारे चार हजार टन कचऱ्याचे ढीग शहरात पडून आहेत. कचऱ्यावर प्रक्रिया करण्यासाठी येत्या दोन दिवसांत जागांचा शोध अंतिम होईल, असे महापौरांनी सांगितले आहे.
Web Title: marathi news aurangabad news garbage