एकाच गावात १५ दिवसांत तीन शेतकर्‍यांच्या आत्महत्या

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 17 ऑगस्ट 2017

पाथरी : खाजगी कर्ज काढून दोनदा पेरणी केल्यानंतर ही पावसाअभावी पीक न उगवल्याने नैराश्यातून एका तरुण शेतकऱ्याने विहिरीत उडी घेऊन आत्महत्या केल्याची घटना तालुक्यातील जवळा झुटा येथे आज उघडकीस आली. गेल्या चार दिवसांपासून हा शेतकरी बेपत्ता होता. गेल्या पंधरा दिवसात जवळा झुटा गावातच ही तिसरी आत्महत्या झाल्याने तालुक्यात दुष्काळाची प्रचंड वाढल्याचे दिसून येत आहे

पाथरी तालुक्यातील जवळा झुटा येथील चांडीराम सुखदेव एडके (वय 35) हा तरुण शेतकरी गेल्या चार दिवसांपासून बेपत्ता होता. आज सकाळी शिवारातील एका पडीक विहिरीत त्याचा मृतदेह आढळून आला. घटनेची माहिती मिळताच पाथरी पोलिसांनी पंचनामा केला.

या वेळी त्याचे वडील सुखदेव एडके यांनी पोलिसांन माहिती दिली. त्यांच्याकडे तीन एकर शेती असून तीन मुले आहेत. दरवर्षी एक मुलगा शेतकरी करत असे. या वर्षी चण्डिकाराम हा शेती करत होता, खाजगी कर्ज काढून पेरणी केली मात्र पाऊस पडला नसल्याने शेतात पेरलेले उगवले नसल्याने तो नैराश्यात होता, त्यातूनच ही आत्महत्या केल्याचे कुटुंबीयांनी सांगितले.

या एकाच गावात पंधरा दिवसांत तीन आत्महत्या झाल्या आहेत.