महापालिका देणार तीन हजार जणांना नोकऱ्या

Aurangabad-Municipal
Aurangabad-Municipal

औरंगाबाद - महापालिका व जिल्हा उद्योजकता विकास केंद्रातर्फे पहिल्यांदाच रोजगार मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे. बुधवारी (ता. २१) मौलाना अबुल कलाम आझाद संशोधन केंद्र येथे होणाऱ्या मेळाव्यात तीन हजार १४ जागांसाठी मुलाखती होणार असून, १४ संस्था-कंपन्या यावेळी सहभागी होणार आहेत. 

महापालिकेतर्फे दीनदयाल अंत्योदय राष्ट्रीय नागरी उपजीविका अभियान राबविण्यात येत असून, त्याअंतर्गत बेरोजगार युवक-युवतींना प्रशिक्षण देण्यात येते. प्रशिक्षण घेतल्यानंतर त्यांना नोकरीच्या संधी मिळाव्यात म्हणून पहिल्यांदाच प्रयत्न करण्यात येत आहेत. जिल्हा उद्योजकता केंद्राच्या सहकार्याने बुधवारी सकाळी नऊ ते सायंकाळी सहा या वेळेत रोजगार मेळावा होणार आहे. या वेळी चिकलठाणा, शेंद्रा, चितेगाव, वाळूज एमआयडीसीतील नामांकित कंपन्या व खासगी संस्था सहभागी होणार आहेत. त्यांच्याकडे असलेल्या उपलब्ध जागांनुसार थेट मुलाखती घेऊन पात्र उमेदवारांची निवड केली जाणार आहे. सकाळी नऊ वाजता नोंदणी सुरू होणार असून, शैक्षणिक कागदपत्रे, आधार कार्ड, छायाचित्र, ओळखपत्र, बॅंक खात्यासंबंधी कागदपत्रे घेऊन बेरोजगार युवकांनी हजर राहावे, असे आवाहन महापालिकेतर्फे करण्यात आले आहे. 

या जागांसाठी संधी 
डॉक्‍टर, रिसेप्शनिस्ट, वॉर्ड बॉय, नर्सिंग, पॅरामेडिकल स्टाफ, कस्टमर सर्व्हिसेस, डायलिसीस टेक्‍निशियन, वेब डिझायनर, सेल्स एक्‍झिक्‍युटिव्ह, डाटा ऑपरेटर, मशीन ऑपरेटर यासह इतर जागांचा समावेश आहे. दीनदयाल अभियानात प्रशिक्षण घेणाऱ्यांना प्राधान्य राहणार असून, इतरांना नंतर संधी मिळणार आहे.

या कंपन्या सहभागी होणार (कंसात जागा) 
रोपळेकर हॉस्पिटल, आरोग्य मल्टिसर्व्हिसेस (२४३), मोर सुपर मार्केट (२८), युनाइटेक सिग्मा हॉस्पिटल (५०), श्रीराम कॉम्प्युटर, मोदी इन्व्हॉशन्स प्रा.लि. (२४०), अरिहंत, एक्‍स्पर्ट ग्लोबल, कॉम-आयटी टेक्‍नो (५०), चिंतामणी मल्टिसर्व्हिसेस, शिव इंटरनॅशनल (७८), संजीव ऑटो, श्री कन्सल्टन्सी प्रा.लि. (७०), ऋचा इंजिनिअरिंग, क्रेसेन्डो ट्रान्स्फॉर्मेशन (४५), मेटल मॅन इंडस्ट्रीज, ए.एन. टेक्‍नो प्रा. लि. (२२५), पटेल कन्स्ट्रक्‍शन, बर्ड बॉक्‍स सर्व्हिसेस (२०), रेनबो, गुरू, स्काय मल्टी, रिअल टीम, अभिनय फाउंडेशन, रिद्धी-सिद्धी कोटक्‍स प्रा.लि. (४५८), ग्रीव्हज कॉटन लि., ऋषी फायबर (१५५), विद्युत मंडळ सुशिक्षित बेरोजगार सहकारी संस्था, धूत ट्रान्समिशन प्रा. लि. (४७५), सत्या स्कील डेव्हलपमेंट, कोजन्ट ई-सर्व्हिसेस वडोदरा (८९७). 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com