नायब तहसीलदारासह कारकुनाला लाच घेताना अटक

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 18 जून 2017

बीड - बीड येथील पुरवठा विभागात आठ दिवसांपूर्वीच रुजू झालेल्या नायब तहसीलदारासह एका अव्वल कारकुनाला "डेटा एन्ट्री'चे बिल काढण्यासाठी एक लाख रुपये लाच घेताना शनिवारी (ता. 17) लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने रंगेहाथ पकडले. या दोघांनाही अटक केली असून, त्यांच्याविरुद्ध पोलिसांत गुन्हा नोंदविण्यात आला.

माधव काळे व अभिजित दहिवाळ अशी लाचप्रकरणी अटक केलेल्यांची नावे आहेत.
परभणी येथील महात्मा फुले मल्टिसर्व्हिसेस या संस्थेला 15 लाख रुपयांचे "डेटा एन्ट्री'चे काम मंजूर झाले होते. यापैकी 10 लाख रुपयांचे देयक अदाही झालेले आहे. बाकी असलेले पाच लाख रुपयांचे देयक देण्यासाठी काळे व दहिवाळ यांनी दोन लाख रुपयांची मागणी केली होती. या संदर्भात तक्रार आल्यानंतर लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने शनिवारी सापळा रचून एक लाख रुपये स्वीकारताना काळे आणि दहिवाळ या दोघांना पकडले. विशेष म्हणजे काळे नायब तहसीलदार म्हणून पुरवठा विभागात आठ दिवसांपर्वीच बदलून आले होते.