राज्यभरात चार विभागीय बैठका - प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे 

marathi news Four departmental meetings across the state - state president Raosaheb Danwe
marathi news Four departmental meetings across the state - state president Raosaheb Danwe

औरंगाबाद - भाजप प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांच्या अध्यक्षतेखाली शुक्रवारी (ता.24) औरंगाबादेत विभागीय बैठक घेण्यात आली. यात बुथनिहाय रचना ते विस्तारक नेमणुक याबाबत चर्चा करण्यात आली. याविषयी प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांनी पत्रकार परिषदेत सांगितले की, राज्यभर सगळीकडे विभागीय स्तरावर आम्ही बैठका घेणार आहेत. यात 26 नोव्हेंबर नाशिक, 27 नोव्हेंबर पुणे, 28 नोव्हेंबर ठाणे आणि 30 नोव्हेंबरला नागपूर येथे बैठक पार पडणार आहेत. 

राज्यभरात 91 हजार बुथ असून याबाबात या बैठकींमध्ये चर्चा करण्यात येणार आहे. तसेच प्रत्येक बुथचे ए बी सी डी प्रमाणे वर्गीकरणही करण्यात आले आहेत. याच बैठकींमध्ये बुथ विस्तारासाठी विस्तारक नेमण्यात येणार आहेत. यातून पक्ष स्वबळावर लढणार की काय यासाठी परिस्थितीचा आढावा घेतला जाईल. राज्यात भाजप एक नंबरचा पक्ष आहेत. विधान परिषदेसाठी आम्ही नावे पाठविलेली नाही. ती उद्या पाठविण्यात येईल, असेही रावसाहेब दानवे यांनी सांगितले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com