परळीत मोठ्या ग्रामपंचायती धनंजय मुंडेंकडे

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 9 ऑक्टोबर 2017

बीड : ग्रामपंचायत निवडणुका जरी स्थानिक समिकरणांवर लढल्या जात असल्या तरी या निवडणुकीत परळी मतदार संघात राष्ट्रवादीचाच बोलबाला दिसत आहे. परळी मतदार संघातील मोठ्या ग्रामपंचायती धनंजय मुंडे गटाने जिंकल्या. यामध्ये गोपीनाथगड असलेल्या पांगरी ग्रापंपचायतीवरही राष्ट्रवादीनेच झेंडा फडकवला.

जिल्ह्यातील ६५५ ग्रापंचायतींसाठी शनिवारी मतदान होऊन सोमवारी मतमोजणी झाली. पालकमंत्री पंकजा मुंडे आणि विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांचे सर्चस्व असलेल्या या मतदार संघात दोघांचे समर्थक आमने - सामने होते. त्यामुळे या निकालाकडे सर्वाधिक लक्ष होते. दुपार पर्यंत हाती आलेल्या निकालांमध्ये धनंजय मुंडे यांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रवादीने आघाडी घेतल्याचे चित्र होते. मतदार संघातील घाटनांदूर, बर्दापूर या अंबाजोगाई तालुक्यातील दोन ग्रामपंचायतींसह 

धर्मापूरी, नागापूर या ग्रामपंचायतीं राष्ट्रवादीने जिंकल्या. तर, गोपीनाथगड असलेल्या पांगरी (ता. परळी) ग्रामपंचायतीवरही धनंजय मुंडे यांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रवादीने झेंडा फडकवला. सरपंचासह ११ पैकी राष्ट्रवादीचे १० सदस्य विजयी झाले. तर, इंजेगाव, कनेरवाडी व जिरेवाडी या ग्रामपंचायती भाजपने जिंकल्या. काही ग्रामपंचायतींवर दोघांच्या समर्थकांनी दावा केला आहे.