राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसनी केले 'पकोडा तळो' आंदोलन 

राजेभाऊ मोगल 
बुधवार, 7 फेब्रुवारी 2018

औरंगाबाद - भाजपने 2 कोटी युवकांना रोजगार देऊ, असे आश्‍वासन निवडणुकीदरम्यान दिले होते. मात्र, अद्यापही रोजगार उपलब्ध झालाच नाही. या निषेधार्थ राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसने बुधवारी (ता. 7) क्रांती चौकात पंडित दिनदयाल उपाध्याय यांच्या नावे पकोडा रोजगार योजना असे फलक लावून 'पकोडो तळो' आंदोलन केले. लोकसभा निवडणूक प्रचारादरम्यान 2 कोटी युवकांना रोजगार उपलब्ध करुन देण्याची घोषणा भाजपने केली होती. या घोषणेचे काय झाले, याबाबत एका वृत्तवाहिनीवर त्यांना प्रश्न विचारण्यात आला होता. 

पंतप्रधानांनी पकोडा विकून कुणी 200 रुपये रोज कमावत असेल, तर तो चांगला व्यवसाय असल्याचे मत व्यक्त केले होते. तसेच पकोडे विकणे हा एक मोठा रोजगार असल्याचे म्हटले होते. आमच्या पालकांनी आर्थिक ताण सहन करत आम्हाला पदवीपर्यंतचे शिक्षण दिले आहे. ते यासाठीच का? पंतप्रधानांनी चहा विकून स्वत:चा उदरनिर्वाह केला. तीच स्वप्न ते देशातीले उच्च शिक्षित तरुणांना दाखवित तर नाही ना? असे प्रश्‍न यावेळी आंदोलक तरुणांनी उपस्थित केले. तसेच अद्यापही रोजगार उपलब्ध होत नसल्याने सरकारचा निषेध केला. सुशिक्षीत बेरोजगारांना शासकीय आवारात पकोडा विकण्यासाठी सुशिक्षित बेरोजगारांना जागा उपलब्ध करुन द्यावी, अशी मागणी देखील यावेळी करण्यात आली. राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसचे मयूर सोनवणे, अमोल दांडगे यांच्या नेतत्वाखाली झालेल्या या आंदोलनात दिपक बहिर, राहुल पाटील, अक्षय शिंदे, संदीप जाधव, मंगेश शेवाळे, दिक्षा पवार, जितेंद्र गायकवाड, तेजस खरात, सागर नलावडे, सुमीत कुलकर्णी, जुबेर शेख यांचा सहभाग होता. 

Web Title: marathi news marathwada ncp pakoda talo agitation