जयभवानी विद्यालयात हरि नामाचा गजर

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 4 जुलै 2017

गेवराई (बीड): देव निर्विकार आहे भक्ताला दर्शन देण्यासाठी त्याला सगुण रुपात यावे लागते, त्यासाठीच तो पंढरपुरी विटेभर उभा आहे, असे प्रतिपादन ह.भ.प.श्रीकृष्ण महाराज खामकर यांनी केले.

ते आषाढी एकादशी निमित्ताने ता.४ रोजी गढी येथील  जयभवानी विद्यालयात आयोजित केलेल्या किर्तन समारंभात  किर्तन करताना बोलत होते. गढी येथील जयभवानी  माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयात आषाढी एकादशी निमित्ताने किर्तन सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते.

यावेळी ह.भ.प.श्रीकृष्ण महाराज खामकर यांनी संत ज्ञानेश्वर महाराजांच्या रचनेवर निरुपन केले.यावेळी विद्यालय परिसर  विठ्ठल गजराने दुमदुमून गेले होते.या किर्तनाला हर्मोनिएमवर गायकवाड के.एन.यांनी तर मृदंगावर राजेंद्र काळे यांनी साथ दिली.गढी येथील भजनीमंडळाने टाळकरी म्हणून संगितसाथ दिली

 यावेळी प्राचार्य डॉ. एस.डी.पटेल ,उपप्राचार्य सानप आर.एस.यांच्या सह सर्व शिक्षक,शिक्षकेतर कर्मचारी, सर्व विद्यार्थी उपस्थित होते.