केज नगराध्यक्ष आदित्य पाटलांविरुद्ध गुन्हा

केज नगराध्यक्ष आदित्य पाटलांविरुद्ध गुन्हा

केज - नगरपंचायतअंतर्गत प्रभाग क्रमांक बारामधील रस्ता व नाली बांधकामासाठी सात लाख छत्तीस हजार ७८६ रुपयांचा विकासनिधी काम न करता हडप केल्याने विद्यमान नगराध्यक्ष आदित्य पाटील यांच्यासह सहा जणांवर केज पोलिस ठाण्यात सोमवारी (ता. २०) उशिरा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणी राष्ट्रवादी काँग्रेसच्या नगरसेविका मालती गुंड यांनी केज पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली होती; मात्र गुन्हा दाखल झाला नव्हता. त्यामुळे त्यांनी न्यायालयात धाव घेतली होती. न्यायालयाच्या आदेशावरून संबंधितांवर लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या चौकशीनंतर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.  

शहरातील प्रभाग क्रमांक बारामधील रस्ता व नाली बांधकामासाठी ११ डिसेंबर २०१५ रोजी सात लाख ३७ हजार रुपयांचा निधी मंजूर झाला होता. हे बांधकाम न करताच मुख्याधिकारी पुष्पगंधा बालासाहेब भगत, कंत्राटदार विलास ज्ञानोबा थोरात, तत्कालीन नगराध्यक्ष कबिरोद्दीन नसिरोद्दीन इनामदार, तत्कालीन उपनगराध्यक्ष आदित्य अशोक पाटील, नगरसेवक पशुपतिनाथ दांगट, अभियंता सुभाष रोकडे यांनी संगनमताने अपहार केल्याचा अरोप आहे.  अंबाजोगाई न्यायालयाने या प्रकरणात लाचलुचपत प्रतिबंधक विभागाला चौकशी करून गुन्हे दाखल करण्याचे आदेश एक महिन्यापूर्वी दिले होते. चौकशीअंती लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे उपअधीक्षक बाळकृष्ण हनपुडे पाटील यांच्या फिर्यादीवरून फसवणुकीसह भ्रष्टाचार प्रतिबंधक अधिनियमांतर्गत नगराध्यक्ष आदित्य पाटील यांच्यासह सहा जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com