आजीबाईंना भेटला जिल्ह्याधिकाऱ्यांच्या रूपात श्रावण बाळ !

शिवशंकर काळे
शनिवार, 8 जुलै 2017

सोन्याबाई पंढरी देवकत्ते (वय 68, रा. धोंडवाडी, ता. जळकोट) असे या महिलेचे नाव आहे. हा अनोखा अनुभव जिल्हाधिकारी श्रीकांत यांना गुरुवारी लातूर ते उदगीर प्रवासात आला.

जळकोट : जिल्हाधिकारी जी. श्रीकांत हे गुरुवारी (ता. सहा) बैठकीसाठी लातूरहून उदगीरला जात असताना अंजनसोडा पाटीवर (ता. उदगीर) खासगी प्रवासी वाहन समजून त्यांच्या कारला एका आजीबाईने हा दाखविला. जिल्हाधिकाऱ्यांनी आजीबाईंना कारमध्ये घेतले. अंजनसोडा ते  उदगीर प्रवासात आजीबाईंची सर्व हकिगत जिल्हाधिकाऱ्यांनी जाणून घेतली आणि शुक्रवारी (ता. सात) आजीबाईंना श्रावणबाळ योजनेतून अनुदान मंजूर झाले.

सोन्याबाई पंढरी देवकत्ते (वय 68, रा. धोंडवाडी, ता. जळकोट) असे या महिलेचे नाव आहे. हा अनोखा अनुभव जिल्हाधिकारी श्रीकांत यांना गुरुवारी लातूर ते उदगीर प्रवासात आला. अंजनासोंडा पाटीवर लेकीच्या गावावरून धोंडवाडी (ता. जळकोट) या आपल्या गावी निघालेल्या सोन्याबाई देवकत्ते या बसची वाट पाहत उभ्या होत्या. मिळेल त्या वाहनाने जाण्याचा त्यांचा बेत होता. यातच तेथून जात असलेल्या जिल्हाधिकाऱ्यांच्या वाहनाला त्यांनी हात दाखवला. 

त्यानंतर वाहन थांबले व स्वतः जिल्हाधिकारी श्रीकांत यांनी उतरून त्या महिलेला वाहनात बसवले. त्या महिलेची श्रीकांत यांनी आस्थेने विचारपूस केली. तिला तहसीलदार कोण असतो, सरपंचांचे काम काय असते, हेही माहीत नव्हते. महिलेच्या हातात पिशवी होती व त्यात तिच्या मुलीने दिलेले खाद्यपदार्थ व तुपाचा डबा होता. महिलेची विचारपूस करताना जिल्हाधिकाऱ्यांनी डब्यातील तूप चाखूनही पाहिले. महिलेला तिचा एकुलता एक मुलगा सांभाळत नसल्याचे, तसेच तिने संजय गांधी किंवा अन्य योजनेचा लाभ घेतला नसल्याचे समजले. 

उदगीरला गेल्यानंतर श्रीकांत यांनी त्या महिलेला तातडीने अनुदान मंजूर करण्याचे आदेश उपविभागीय अधिकाऱ्यांना दिले. त्यानंतर प्रशासनाकडून वेगवान हालचाली झाल्या. तहसीलदार शिवनंदा लंगडापुरे यांच्या पुढाकाराने घोणसीचे तलाठी डी. एच. करमले यांनी धोंडवाडी येथे जाऊन शुक्रवारी त्या महिलेकडून श्रावणबाळ योजनेसाठी अर्ज भरून घेतला आणि त्यासाठी लागणारी कागदपत्रे जमा केली. लवकरच महिलेला योजनेतून अनुदान मिळणार आहे. 

सरकारनामावरील राजकीय बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा :
सदाभाऊ, तेवढं वीज कनेक्‍शनचं बघा..!​
महाराष्ट्र सदन ते 11 सफदरजंग रोड : अखेर आठवलेंना मिळाला बंगला​
शेतकरी सरकारला "सरसकट' धक्का देतील : शरद पवार​
सदाभाऊ खोत स्वाभिमानीच्या बैठकीत "धूमधडाका' उडवून देणार; 
विश्वास पाटील यांच्या वादग्रस्त निर्णयांची माहिती मागविली​
पंचायत राज समितीला लाच देणाऱ्या धुळ्याच्या डेप्युटी सीईओला अटक​
पंतप्रधान नरेंद्र मोदींनी कशाकशात लक्ष घालायचं?​
अखेर गृहराज्यमंत्र्यांच्या वडिलांविरुद्ध गुन्हा दाखल​