मराठवाड्यात दोन शेतकरी आत्महत्या 

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 30 जून 2017

औरंगाबाद - बीड जिल्ह्यातील नागझरी येथे खासगी सावकर आणि बॅंकेच्या कर्जाला कंटाळून भास्कर विठ्ठल येळवे (वय 55) या शेतकऱ्याने गुरुवारी आत्महत्या केली आहे. येळवे यांच्याकडे चार एकर शेती होती. काही वर्षांतील नापिकीमुळे त्यांना नैराश्‍य आले होते. त्यांच्यावर खासगी सावकार आणि बॅंकांचे कर्ज असल्याचे नातेवाइकांनी सांगितले. या विवंचनेतूनच त्यांनी गळफास घेतला. दुसऱ्या घटनेत लातूर जिल्ह्यातील जळकोट येथे रामचंद्र ऊर्फ बबन दतात्रय भोसले (वय 28) या युवा शेतकऱ्याने आत्महत्या केली. कर्जबाजारीपणाला कंटाळून बुधवारी त्यांनी विष प्राशन केले होते. उपचारादरम्यान लातूर येथे गुरुवारी त्याचा मृत्यू झाला.

औरंगाबाद - बीड जिल्ह्यातील नागझरी येथे खासगी सावकर आणि बॅंकेच्या कर्जाला कंटाळून भास्कर विठ्ठल येळवे (वय 55) या शेतकऱ्याने गुरुवारी आत्महत्या केली आहे. येळवे यांच्याकडे चार एकर शेती होती. काही वर्षांतील नापिकीमुळे त्यांना नैराश्‍य आले होते. त्यांच्यावर खासगी सावकार आणि बॅंकांचे कर्ज असल्याचे नातेवाइकांनी सांगितले. या विवंचनेतूनच त्यांनी गळफास घेतला. दुसऱ्या घटनेत लातूर जिल्ह्यातील जळकोट येथे रामचंद्र ऊर्फ बबन दतात्रय भोसले (वय 28) या युवा शेतकऱ्याने आत्महत्या केली. कर्जबाजारीपणाला कंटाळून बुधवारी त्यांनी विष प्राशन केले होते. उपचारादरम्यान लातूर येथे गुरुवारी त्याचा मृत्यू झाला. भोसले यांच्या नावावर दोन एकर जमीन असून त्यांच्यावर जिल्हा मध्यवर्ती बॅंकेसह अन्य दोन बॅंकांचे कर्ज होते.