करणीच्या कारणावरून वृद्धाला बेदम मारहाण

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 3 जुलै 2017

आखाडा बाळापूर (जि. हिंगोली) - येथून जवळच असलेल्या भुरक्‍याची वाडी येथे एका वृद्धास ‘तू करणी व भानामती करतोस’, असे म्हणून तिघांनी बेदम मारहाण करून जखमी केले. उपचारानंतर वृद्धाचा मृत्यू झाला. याबाबत बाळापूर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.

आखाडा बाळापूर (जि. हिंगोली) - येथून जवळच असलेल्या भुरक्‍याची वाडी येथे एका वृद्धास ‘तू करणी व भानामती करतोस’, असे म्हणून तिघांनी बेदम मारहाण करून जखमी केले. उपचारानंतर वृद्धाचा मृत्यू झाला. याबाबत बाळापूर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.

पोलिसांनी दिलेली माहिती अशी, की भुरक्‍याची वाडी येथे रविवारी (ता. २७) आत्माराम पागोजी आम्ले यांना गावातील दिनू शेळके, बसाजी शेळके, केशव बसाजी शेळके यांनी संगनमत करून शिवीगाळ केली. ‘तू करणी-धरणी का करतोस,’ या कारणावरून लाकडी दांड्याने व लाथाबुक्‍क्‍यांनी मारहाण केली. यात आत्माराम पागोजी आम्ले हे गंभीर जखमी झाले. त्यांना तातडीने नांदेड येथे उपचारासाठी दाखल करण्यात आले. मात्र, उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला.

त्यांचा मुलगा साहेबराव आत्माराम आम्ले यांच्या फिर्यादीवरून आरोपी दिनू शेळके, बसाजी शेळके, केशव बसाजी शेळके (सर्व राहणार भुरक्‍याची वाडी) यांच्याविरुद्ध आखाडा बाळापूर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. पुढील तपास सहायक पोलिस निरीक्षक व्यकंटी केंद्रे हे करीत आहेत.

मराठवाडा

पूर्णा (परभणी): तालुक्यातील बरबडी येथील लक्ष्मण गणेश सोलव या बावीस वर्षीय अल्पभूधारक शेतकऱ्यांने कर्जबाजारीपणामुळे गळफास घेऊन...

06.57 PM

मराठवाडा जनता विकास परिषदेच्या पाठपुराव्याला यश औरंगाबाद : दमणगंगेचे पन्नास टीएमसी (50 अब्ज घनफुट) पाणी गोदावरी खोऱ्यात सोडून...

06.09 PM

लोहा : बैलगाडा घेऊन शेतीकामाला जात असताना बैलगाडा उलथून झालेल्या अपघातात शेतमजुराचा मृत्यू झाला. ही घटना हिप्परगा गावालगतच्या...

05.30 PM