परभणीच्या महापौरपदी मीनाताई वरपुडकर; उपमहापौरपदी सय्यद समी

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 16 मे 2017

परभणी - महापालिकेच्या महापौरपदी मीनाताई वरपुडकर यांची तर उपमहापौरपदी काँग्रेसचे सय्यद समी उर्फ माजू लाला यांची मंगळवारी (ता.16) निवड झाली.
 

परभणी - महापालिकेच्या महापौरपदी मीनाताई वरपुडकर यांची तर उपमहापौरपदी काँग्रेसचे सय्यद समी उर्फ माजू लाला यांची मंगळवारी (ता.16) निवड झाली.
 
परभणी महापालिकेच्या महापौर पदासाठी मंगळवारी (ता.16) सकाळी दहा वाजता विशेष सभा बोलावण्यात आली होती. महापालिकेच्या बी. रघुनाथ सभागृहात झालेल्या सभेत काँग्रेसच्या महापौरपदाच्या उमेदवार मीनाताई वरपुडकर यांना 40 मते पडली.  तर त्यांच्या प्रतिस्पर्धी राष्ट्रवादी काँग्रेसच्या शेख आलिया अंजूम यांना केवळ 19 मते मिळाली. या मतदान प्रक्रियेत शिवसेनेचे पाच तर राष्ट्रवादी काँग्रेसचा एक सदस्य अनुपस्थित राहिला. उपमहापौर पदासाठी काँग्रेसचे सय्यद समी उर्फ माजूलाला व भाजपच्या डॉ. विद्या पाटील यांचे उमेदवारी अर्ज होते. यात उपमहापौर पदासाठी माजू लाला यांना 32 मते मिळाली तर भाजपच्या डॉ. विद्या पाटील यांना केवळ आठ मते मिळाली. या मतदान प्रक्रियेतही शिवसेनेचे व राष्ट्रवादी कॉग्रेसचे नगरसेवक तटस्थ राहिले.